घरफिचर्ससारांशअनुभूती दिव्यत्वाची !

अनुभूती दिव्यत्वाची !

Subscribe

‘येता..जाता..क्षण वेचलेले’, या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अपेक्षा खामकर जोगेश्वरी (पूर्व) येथील बालविकास विद्या मंदिर (माध्यामिक) मेघवाडी येथील निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय, सकारात्मकतेने कार्यरत असल्याने सामाजिक बांधिलकी, आत्मप्रतिष्ठा, कार्यतत्परता, कष्टाचे महत्व याचा पगडा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला व्यापून उरला आहे. या दिव्यत्वाची अनुभूती पुस्तकातील विविध लेखांमधून येते.

‘स्व’ चा समृद्ध होत जाणारा जीवनानुभव !
‘येता…जाता… क्षण वेचलेले’, हे डॉ. अपेक्षा खामकर यांचे आत्मानुभव सरळ, सोप्या सुभाषितवजा वाक्यांतून व्यक्त करणारे पुस्तक!

विजयराज बोधनकर यांनी या पुस्तकाची मुखपृष्ठ मांडणी केली आहे. सात पायर्‍यांची चढण चढून गेलेली प्रकाशमय झालेली स्त्री दिव्यत्वाच्या दीपाकडे मार्गक्रमण करते आहे. डोक्यावर स्थिरावलेलं निळ आकाश शांत. या सर्वांनी हे वेचलेले क्षण आनंदमय होऊन जातात. पुस्तकातल्या ‘स्व’ सारखे.

- Advertisement -

डॉ. खामकर यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे. गुरुवर्य डॉ. रमेश कुबल यांना कृतज्ञतेने, नम्रतेने.
या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलीय डॉ. विजया वाड यांनी. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणतात, ‘येता जाता क्षण वेचलेले कशी सुखाच्या भारे वाकलेले, आनंद झुल्यावर हळू हेलकावलेले, जिंकलेले नि हरलेले.’
डॉ. अपेक्षा खामकर यांच्या लिहित्या हाताना डॉ. विजया वाड यांनी आशीर्वाद दिले आहेत.

चित्रकार विजयराज बोधनकर यांनी बोध अंतरीचे…. यात लेखिकेच्या लेखन प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
हृदगतात लेखिकेने वयाची साठी जवळ आली असताना निवृत्तीनंतर, जमा झालेल्या या आठवणी, सध्या स्थितीतील जगणे, अंधेरी विरारमधील प्रवास त्यातील अनुभव यांच्यातील मेळ शब्दबद्ध केला आहे.

- Advertisement -

या पुस्तकात एकूण २४ ललित लेख आहेत. लेखिकेच्या जन्मवेळी तिच्यासाठी तयार करवून घेतलेल्या फणसीपाळणा या पहिल्या लेखापासून सुरुवात होते. बालपणात प्रवेश होतो. रत्नागिरी जिल्हा, लांजा तालुक्यातील छोटसं गाव खेरावसे. कौलारू एैसपैस घर, तिथल्या आठवणी, आजीच्या आठवणी यांना ठळक स्थान आहे. या पुस्तकभर गावचं घर, शाळेची इमारत तिथला निसर्ग साथ करतात.

निसर्गाच्या शाळेत लेखिका स्वतः रमतातच, पण आपल्या अथर्व, आर्या या नातवंडांना रमवतात. स्मृतींची पाखरे या लेखांत आजी, वडील (दादा), कुबल सर ही व्यक्तीचित्रण जिवंत झाली आहेत. आजी माझी प्रारंभिक गुरू, दादा आकार देणारे गुरू तर कुबल सर शिखरापर्यंत पोहण्यासाठी मार्गदर्शक गुरू असा उल्लेख लेखिका करतात.
कुंकू, पूजा रस्ता, वापर, आसन, कोपरा, उभारणी, मनमंथन यासारक्या लेखातून त्या संकल्पनेला एक नवीन आयाम लेखिका प्राप्त करून देतात.

महापौर निवास ते राजभवन, अनुभूती दिव्यत्वाची! या लेखांतून लेखिकेला वैयक्तिकरित्या आलेले अनुभव सकारात्मक ऊर्जेने व्यक्त झाले आहेत.

‘लक्षवेधी’ या ललित लेखात जोगेश्वरी गांधीनगर मेघवाडीकडे वळताना कचर्‍याच्या साम्राज्यात वावरणारी ती अनामिका लेखिकेसाठी लक्षवेधी ठरली. १ एप्रिल 2011 ते 15 जून 2014 या कालावधीत लेखिकेने तिची घेतलेली दखल, तिचे केलेले निरीक्षण त्यावर बांधलेले आराखडे व्यक्त केले आहेत. अशाच अनामिक लेखिकेला अंधेरी-विरार प्रवासात, रस्त्यावर दिसलेल्या 25 एप्रिल 2007 ते 12 मार्च 2013 या कालावधीत त्यांच्या झालेल्या भेटी आणि त्यातून त्या व्यक्तींच्या भावविश्वाचा घेतलेला आढावा काव्यात्मकतेने व्यक्त झाला आहे.

यातील 28 लेखांपैकी 9 लेख पूर्ण प्रकाशित आहेत. लेखिका डॉ. अपेक्षा खामकर जोगेश्वरी (पूर्व) येथील बालविकास विद्या मंदिर (माध्यामिक) मेघवाडी येथील निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय, सकारात्मकतेने कार्यरत असल्याने सामाजिक बांधिलकी, आत्मप्रतिष्ठा, कार्यतत्परता, कष्टाचे महत्व याचा पगडा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला व्यापून उरला आहे. याचा प्रत्यय त्यांच्या ‘क्षणक्षणैक्य’, ‘चेहरा’, या ललित लेखांतून येतो.

लेखिकेने त्यांच्या ‘अहो’ चा उल्लेख पुस्तकातील दोन ठिकाणी केला आहे. हा उल्लेख अहोंनी त्यांना दिलेली मूक, पण भक्कम साथ व्यक्त करतो. प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला डाव्या बाजूच्या चौकटीत त्या लेखाविषयी उत्सुकता वाढविणारे छोटेखानी कोटेशन लेखिकेने उदृत केले आहे.

मलपृष्ठावर लेखिकेच्या फोटोसहित त्यांच्या कार्याचा तपशील दिला आहे. एक समृद्ध ‘स्व’ अनुभव कथन म्हणून पुस्तक वाचनीय झालं आहे.

लेखिका – डॉ. अपेक्षा खामकर
संवेदना प्रकाशन
मूल्य रू. 180/-
पृष्ठे – १६३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -