घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : गुरुवार, २५ जुलै २०१९

राशिभविष्य : गुरुवार, २५ जुलै २०१९

Subscribe

मेष :- तुमचे मन स्थिर होईल. तुमचा विचार पटवून देण्याचा प्रयत्न करा. हट्ट धरू नका.
वृषभ :- काम करण्यास क्षुल्लक अडचण येईल. मन अस्थिर झाल्याने कामात गोंधळ होऊ शकतो.
मिथुन :- तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. पदाधिकार मिळण्याची शक्यता वाढेल.
कर्क :- कठीण काम करून घ्या. नोकरी लागेल. तुमचा प्रभाव, लोकप्रियता वाढेल.
सिंह :- कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करता येईल. अरेरावी करू नका. ऐकून घ्या.
कन्या :- कायद्याच्या बाबतीत सावध रहा. भांडण वाढवू नका. दगदग करावी लागेल.
तूळ :- सर्वांच्या मनाचा विचार करून निर्णय घेता येईल. धंद्यात फायदा होईल. ठरविलेले काम कराल.
वृश्चिक :- विरोधाला सौम्य भाषेत उत्तर द्या. धंद्यात नोकर माणसे कमी होतील. गोड बोला.
धनु :- अपेक्षित व्यक्ती भेटेल. तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची वस्तू वेळीच जागेवर ठेवा.
मकर :- कामाचा वेग वाढवा. पुढची योजना तयार करा. धंद्यात मागे राहू नका.
कुंभ :- तुमच्या बोलण्याला चांगला प्रतिसाद मिळेल. तरीही काही लोक कुरबुर करतील. युक्ती वापरा.
मीन :- तुमचा अंदाज बरोबर येईल. कठीण काम करून घ्या. चर्चा व भेट सफल होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -