आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल अशी घटना घडेल. तुमची लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत चांगले यश मिळेल.

वृषभ :- घरातील वादाचे कारण शोधा. त्यावर योग्य उपाय शोधू शकाल. धंद्यातील समस्या सोडवण्यात यश मिळेल.

मिथुन :- तुमच्यावर अवलंबून राहू नका. स्वतःचे काम स्वतः करा. वरिष्ठांचा मान ठेवा. कुणाचाही अनादर करू नका.

कर्क :- तुमचे महत्त्वाचे काम आज होऊ शकेल. प्रयत्न करा. धंद्यात गोड बालून कामगारांकडून काम करून घ्या.

सिंह :- निष्कारण वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. तुमचा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.

कन्या :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मागील येणे वसूल करा. खरेदी-विक्रीत तुमचा अंदाज बरोबर येऊ शकतो.

तूळ :- कामाचे दडपण राहील. आप्तेष्टांची मदत मिळू शकेल. तुमचे धोरण पटवून देण्याची घाई करू नका.

वृश्चिक :- आजचे काम लवकर होऊ शकेल. आळस करू नका. धंद्यात हिशोब करताना भावना आणू नका.

धनु :- तुमचा विचार, अंदाज बरोबर असेल. धंद्यात वाढ करण्याची जिद्द ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मकर :- दूरदृष्टीकोनातून हाती घेतलेले काम यशस्वी होईल. तुमची कामगिरी कौतुकास्पद ठरेल. मैत्री वाढेल.

कुंभ :- तुमचा अनादर होऊ शकतो. सावध रहा. गुप्त कारवाया होतील. रागावर नियंत्रण ठेवा. धोका टाळा.

मीन :- आजचे महत्त्व उद्याला कमी होऊ शकते. मान मिळेल. धंद्यात नवा फंडा उपयुक्त ठरू शकतो.