जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेल. सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. धंद्यात प्रगती व पैसा मिळेल.

वृषभ :- कोर्टाच्या कामात प्रगती होईल. तणाव कमी होईल. जुने मित्र भेटल्याचे समाधान मिळेल.

मिथुन :- वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. धंद्यात नवा फंडा फायद्याचा वाटेल. कोर्ट केस यशस्वी होईल.

कर्क :- घरातील वृद्ध व्यक्तींचा राग येईल. नम्रपणे बोला. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

सिंह :- तुमच्या कामात वरिष्ठ हातभार लावतील. कलेत प्रगती होईल. स्पर्धेत टिकून रहा.

कन्या :- प्रवासात घाई केल्याने नुकसान होईल. रागावर ताबा ठेवा. वृद्धांची काळजी वाटेल.

तूळ :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरीची परीक्षा यशस्वी होईल. आनंदी रहाल.

वृश्चिक :- किरकोळ कारणाने विचलित होऊ नका. अंदाज घेता येईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

धनु :- कठीण प्रश्न सोडवता येईल. कोर्ट केस यशस्वी होईल. धंद्यात फायदा वाढेल. स्पर्धा जिंकाल.

मकर :- प्रगतीचा मार्ग मिळेल. आवडत्या विषयात रमून जाल. धंद्यात नवा विचार उपयोगी पडेल.

कुंभ :- स्थिर मनाने समस्येवर उपाय शोधता येईल. राजकारणात प्रतिष्ठा मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

मीन :- घाई गर्दीत कोणताही प्रश्न सुटत नाही. नम्र रहा. वरिष्ठांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवा. वाहन जपून चालवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here