राशीभविष्य : बुधवार,४ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : ठरवाल ते करून दाखवता येईल. घरातील लोकांची मदत होईल. घरात शुभ घटना घडेल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ : प्रयत्नाशिवाय यश मिळवता येत नाही. ओळखीचा उपयोग होईलच असे नाही. धंद्यात हिशोब तपासा.

मिथुन : तुमच्या अधिकारात वाढ होईल. चांगला बदल घडेल. प्रेमाला चालना मिळेल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

कर्क : सौम्य शब्दात तुमचे मत व्यक्त करा. प्रवासात वाहनापासून धोका संभवतो. कायद्याचे पालन करा.

सिंह : घर, वाहन, जमीन घेण्याचा विचार कराल. दूरच्या प्रवासाचा बेत कराल. कोर्टाच्या कामात यश येईल.

कन्या : आजच्या कामात किरकोळ अडचण येईल. तुम्ही रागावर ताबा ठेवा. मोठ्या लोकांची ओळख होईल.

तूळ : आजचे काम उद्यावर टाकू नका. मेहनतीचा फायदा मिळेल. धंद्यात वाढ होईल. चांगली घटना घडेल.

वृश्चिक : मनावर दडपण घेऊ नका. वेळेला महत्त्व द्या. जुनी ओळख निघेल. काम करून घेता येईल.

धनु : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. मौज-मजा करण्यात आनंद वाटेल. पाहुणे येतील.

मकर : धंद्यात सुधारणा करता येईल. दुर्लक्ष करू नका. मेहनत केल्याचे समाधान मिळेल. ओळख वाढेल.

कुंभ : तुमच्या क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेरणा मिळेल अशी घटना घडेल. मुलांकडून आनंद मिळेल.

मीन : मिळते-जुळते धोरण ठेवा. प्रेमाने बोला. अरेरावीची भाषा केल्यास नुकसान होईल. वाद वाढेल.