राशीभविष्य : सोमवार, २३ मार्च २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आज तुमचा उत्साह वाढेल. महत्वाचे काम करून घ्या. धंद्यात वाढ करता येईल. वसुली करा.

वृषभ : घरातील नाराजीचे कारण कळल्यामुळे त्यावर उपाय शोधता येईल. धंद्यात, नोकरीत प्रगती कराल.

मिथुन : कठीण वाटणारे काम करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. स्पर्धेत प्रगती होईल. ओळखी होतील.

कर्क : धंद्यात कडवट भाषा वापरू नका. गैरसमज होईल. वाहन जपून चालवा. स्पर्धेत कौतुक होईल.

सिंह : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यातील समस्या आजच सोडवा. वरिष्ठांच्या मनाविरुद्ध वागता येणार नाही.

कन्या : क्षुल्लक कारणाने वाद होईल. डोके शांत ठेवणे कठीण वाटेल. व्यसनाने नुकसान होईल. हेकेखोरपणा कराल.

तूळ : ठरविलेले काम आजच करून घ्या. भेटी घेण्यात चर्चा करण्यात यश मिळेल. नोकरी मिळेल.

वृश्चिक : तुमच्या बोलण्यातून जवळचे लोक दुखावले जात नाहीना याकडे लक्ष ठेवा. आळस करता येणार नाही.

धनु : तुमचे ठरविलेले काम पूर्ण करण्यात यश होईल. नोकरीत प्रगती कराल. कला-क्रीडा स्पर्धेत मान-प्रतिष्ठा मिळेल.

मकर : दौर्‍यात यश मिळेल. घरातील व्यक्तीची प्रकृती अस्थिर वाटेल. मन खंबीर करावे लागेल. धंद्यात वाढ होईल.

कुंभ : तुमच्या कामाला प्रोत्साहन दिले जाईल. प्रतिष्ठा वाढेल. साहित्याला नवा विषय मिळेल. केस जिंकाल.

मीन : तुम्ही ठरविलेले काम करून घ्या. नोकरीत वरिष्ठ खुष होतील. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल.