साप्ताहिक राशीभविष्य : रविवार १ डिसेंबर ते शनिवार ७ डिसेंबर २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, शुक्र मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात वेळच्या वेळी जी परिस्थिती निर्माण होईल. त्यानुसार वागावे लागेल. तणाव, वाद होईल. संयम ठेवा. ग्रहांची साथ मिळण्यास सुरुवात झाली आहे. नोकरीत व्याप वाढेल. वरिष्ठांना विरोध करून चालणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा समजून येईल. पुन्हा कोणीतरी त्यात फाटे फोडेल. तडजोड करावी लागेल. शोध मोहीम इतरांच्या मदतीने यशस्वी करता येईल. शिक्षणात उद्धटपणे प्रोफेसरांच्या बरोबर वागू नका. स्पर्धेत कौतुक होईल. शुभ दि. १,२

वृषभ : या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. मेहनत जास्त घ्यावी लागेल. नवीन ओळख झालेल्या बरोबर कोणताही व्यवहार घाईत करू नका. नोकरीत वरिष्ठांना खुश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार ऐकून घेतला जाईल. घरामध्ये वाद होईल. पोटाची काळजी घ्या. पर्स सांभाळा. शोध मोहीम पूर्ण कराल. शिक्षणात मनचंचल करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. शुभ दि. ६, ७

मिथुन : या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात समोरच्या व्यक्तीचे मत ऐकून घ्या. संयमाने प्रश्न सोडवा. गिर्‍हाईक सांभाळा. नोकरीत दादागिरीची भाषा न वापरता काम करा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. अपमान सहन करावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर कठीण काम सोपवले जाईल. तुमच्यावर आरोप येईल. संसारात खेळीमेळीचे वातावरण राहील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. शोध मोहीम नेटाने पूर्ण करा. शिक्षणात आळस नको. बुद्धी वापरा. कला क्षेत्रात मन रमेल. शुभ दि. ३,४

कर्क : या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळू शकेल. प्रयत्न करा. जुने चांगले संबंध सांभाळावे लागतील. नवीन ओळखीवर एकदम भाळून जाऊ नका. नोकरीत प्रभाव पडेल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला अधिकार मिळण्याची आशा वाटेल. जवळच्या लोकांवर नजर ठेवा. भांडू नका. शोध मोहीम फत्ते कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. शिक्षणात योग्य सल्ला घ्या. चांगले मित्र ठेवा. कोेर्ट केस संपवण्याची तयारी करा. शुभ दि. १, २

सिंह : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरु लाभ योग होत आहे. धंद्यात अचानक समस्या येईल. जुळत आलेले काम फिसकटण्याची शक्यता आहे. तुम्ही मन स्थिर ठेवा. दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार पूर्णपणे पटणे कठीण आहे. तडजोड कशी करावयाची याचा विचार करावा लागेल. तुमच्यावर आरोप येईल. नोकरीत काम वाढेल. बदलीची शक्यता दिसते. शोध मोहीम कठीण वाटेल. कोर्ट केस कटकटीची होईल. शुभ दि. ३, ४

कन्या : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभ योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. वसुलीचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीची तक्रार निर्माण होऊ शकते. नोकरीत तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमची शिफारस करतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा सांभाळता येईल. निश्चित धोरण ठरवणे कठीण वाटेल. शोध मोहीम यशस्वी कराल. डोळ्यांची काळजी घ्या. संसारात क्षुल्लक अडचण येईल. घरातील दुरुस्ती करावी लागेल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. १,२

तूळ : या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश शुक्र मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. कामाची गर्दी होईल. त्यामुळे वेळेचे नियोजन पद्धतशीरपणे करावे लागेल. चिडचिड होईल. प्रवासात सावध रहा. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याची संधी येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या नावाचा उल्लेख होईल. अधिकार मिळण्याचे चिन्ह दिसेल. शोध मोहीम यशस्वी होईल. कोर्ट केस संपवता येईल. किरकोळ काम राहू शकते. शिक्षणात पुढे जा. निश्चित दिशा मिळेल. शुभ दि. 3,4

वृश्चिक : तुमच्याच राशीत या सप्ताहात बुध प्रवेश करीत आहे. चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात चांगली परिस्थिती निर्माण होईल. दगदग वाढेल. चिडचिड न करता बोलणी करा. यश मिळेल. नोकरीत प्रभाव पडेल. बुद्धीचे कौतुक होईल. प्रेमाला चालना मिळेल. विवाह, संततीसुख यासाठी प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही प्रगती करू शकाल. सहकार्य मिळेल. अहंकाराची भाषा मात्र उपयोगी पडणार नाही. तुमचा कट यशस्वी होईल. शोध मोहिमेत कौतुक होईल. शिक्षणात प्रगती कराल. शुभ दि. ६, ७

धनु : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, शुक्र मंगळ लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम होण्यास विलंब होईल. प्रयत्न करा. मित्र मदत करतील. अधिकाराचा वापर करून काम करता येणार नाही हे विसरू नका. नोकरीत गुप्त शत्रू चाळे करतील. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा. कठोर प्रतिक्रिया देऊ नका. कोर्ट केसमध्ये मुद्याचे बोला. शोध मोहिमेत जास्त मेहनत घ्यावी लागेल. शिक्षणात मनाचा गोंधळ करू नका. उद्धटपणे मोठ्यांच्या बरोबर वागू नका. शुभ दि. १,२

मकर : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेता येईल. नवे काम मिळेल. नवीन ओळख झालेल्या माणसावर जास्त विश्वास ठेऊ नका. संसारात समस्या येईल. वाद होईल. मिळते-जुळते धोरण ठेवा. या सप्ताहात प्रत्येक दिवस यशाचा ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. कोर्ट केस संपवा. कला-क्रीडा क्षेत्रात महत्त्व वाढेल. जवळचा मित्र दुरावण्याची शक्यता. वाद वाढवू नका. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात एकाग्र मनाने अभ्यास करा. शुभ दि. ३, ४

कुंभ : या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात मोठी संधी मिळेल. धंद्यात वाढ करता येईल.
थकबाकी वसूल करा. घर, वाहन, जमीन घेण्याचा विचार कराल. कोणताही कठीण प्रश्न सोडवा. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी शोधा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. लोकप्रियता मिळेल. संसारात चांगला बदल होईल. विवाह, संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करता येईल. कोर्ट केस संपवा. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी पैसा मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात उच्च प्रतीचे यश मिळवाल. शुभ दि. ३,४

मीन : या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. थकबाकी वसूल करा. नोकरीत फायदा होईल. बदली करून घेता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. शेअर्समध्ये लाभयोग आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार महत्त्वाचा ठरेल. अधिकार प्राप्ती होईल. कोर्ट केस यशस्वी कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात पुढे जा. वाद करू नका. वाहन जपून चालवा. शुभ दि. ६, ७