घरIPL 2020RR vs SRH: तेवतिया चमकला; रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा हैदराबादवर विजय

RR vs SRH: तेवतिया चमकला; रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा हैदराबादवर विजय

Subscribe

राजस्थान रॉयल्सने रोमहर्षक सामन्यात हैदराबाला पराभूत केलं. राहुल तेवातीया आणि रियान परागच्या अखेरच्या षटकांतील फटकेबाजीच्या जोरावर हा सामना ५ गडी राखून जिंकला. हैदराबादच्या १५९ धावांच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, राहुल तेवतिया आणि रियान परागने तळ ठोकत राजस्थानला सामना जिंकवून दिला.

हैदराबादने दिलेल्या लक्ष्यचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या दोन्ही समावीरांना खलील अहमदने तंबुत पाठवलं. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेले बेन स्टोक्स (५) आणि जोस बटलर (१६) दोघेही स्वस्तात बाद झाले. कर्णधार स्टिव्ह स्मिथ (५) चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांना करामती खान राशिदने बाद केलं. संजू सॅमसनने २५ चेंडूत २६ धावा केल्या, तर रॉबिन उथप्पाने १५ चेंडूत १८ धावा केल्या. संघ संकटात असताना दोन युवा खेळाडू रियान पराग आणि राहुल तेवतियाने संघाला सावरलं. अखेरच्या षटकांत या दोन युवा खेळाडूंनी फटकेबाजी करत हरलेला सामना संघाला जिंकवून दिला. रियान परागने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर राहुल तेवतियाने २८ चेंडूत ४५ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. दोघांनीही ८५ धावांची भागीदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशिद खानने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

- Advertisement -

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५९ धावांचं आव्हान दिलं. मनिष पांडेचे अर्धशतक (५४) आणि वॉर्नरची ४८ धावांची खेळी याच्या बळावर हैदराबादने निर्धारित षटकांत ४ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिघांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत १-१ बळी टिपला. या त्रिकुटाला श्रेयस गोपाल आणि बेन स्टोक्स यांनी गोलंदाजीत चांगली साथ दिली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -