घरलाईफस्टाईलअंडा पराठा रेसिपी

अंडा पराठा रेसिपी

Subscribe

जाणून घ्या अंडा पराठ्याची रेसिपी

नाश्तामध्ये अनेक विविध प्रकार असतात. मात्र, काही पदार्थांची तयारी ही आदल्या दिवसापासून करावी लागते. परंतु एखादा झटपट नाश्ता करायचा असल्यास अंडा पराठा ही बेस्ट अशी रेसिपी आहे. चला तर जाणऊन घेऊया अंडा पराठा कसा करावा.

साहित्य

- Advertisement -

१ अंड
१ कांदा
चिमुटभर मिरपूड
थोडी कोथिंबीर
अर्धा चमचा चिली गार्लिक सॉस
एक कप कणीक
चवीनुसार मीठ

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे कणीक तयार करुन त्याचे फुलके लाटून घ्यावेत. आता तव्यावर सगळे फुलके दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत. त्यानंतर आता एक फुलका पुन्हा तव्यावर टाकावा आणि थोडासा गरम झाला की उलटावा. दरम्यान, अंडं फोडून त्यात सर्व मसाला घालून चांगले फेटावे आणि ते मिश्रण त्या फुलक्याच्या गरम बाजूवर तेल लावल्यासारखं लावावं. नंतर त्यावर दुसरा फुलका दाबून बसवावा. अर्ध्या मिनिटाने फुलका हलक्या हाताने उलटावा आणि कडेने चमचाभर तेल सोडा. अशा प्रकारे तुमचा झटपट अंडा पराठा तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -