बनाना केक

banana cake recipe
बनाना केक

बऱ्याचदा केळी जास्त दिवस राहिल्यामुळे काळी पडतात. मग त्या केळ्यांचे काय करावे?, असा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक खास, झटपट आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे बनाना केक.

साहित्य

  • २ पिकलेली केळी
  • १ कप रवा
  • २ लहान चमचे दही
  • २ लहान चमचे तेल
  • १ चमचा बॅकिंग सोडा
  • चवीपुरती साखर
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • टूटी-फ्रुटी

कृती

पिकलेल्या केळीचे साल काढून ती चांगली कुस्करून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात रवा घेऊन त्यामध्ये दही मिसळून चांगले एकजीव करावे. रवाच्या जागी मैदा किंवा गव्हाचं पीठ देखील तुम्ही वापरु शकता. रवा आणि दह्याचा मिश्रणात तेल मिसळा. यामध्ये थोडी साखर मिसळून चांगले एकजीव करावे. या मिश्रणात कुस्करलेले केळ घाला आणि चांगले फेटून त्यामध्ये टूटी-फ्रुटी टाका. हे मिश्रण १५ मिनिट तसेच ठेवावं. जेणे करून रवा यामध्ये चांगला फुलतो. आता या मिश्रणात बॅकिंग सोडा घालून पुन्हा चांगले फेटून घ्या. एका जाडसर कढईत मीठ घालून गरम होण्यासाठी गॅसवर तापवायला ठेवा. आता केकच्या भांड्यात तूप किंवा लोणी लावून मिश्रण भांड्यात ओतून घ्या आणि त्याला एकदा सेट करा. आता गरम केलेल्या कढईत तो साचा ठेवून अर्ध्या तासाला मंद गॅस वर ठेवा, अशाप्रकारे चविष्ट बनाना केक तयार.