शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी झाल्यानंतर शरीर करा सुडौल

या व्यक्तींना वजन कमी झाल्याबद्दल छान वाटते पण कपड्याशिवाय ते स्वत:ला आरशात बघतात, तेव्हा ते निराश होतात

Mumbai

शस्त्रक्रियेद्वारे (बेरिअॅट्रिक सर्जरी) किंवा क्रॅश डाएटिंग अथवा इंट्रागॅस्ट्रिक बलूनसारख्या शस्त्रक्रियेतर मार्गांनी मोठ्या प्रमाणात वजन कमी झाल्यानंतर शरीराच्या विविध अवयवांवरील त्वचा सैल पडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो. कॅलरींचे ग्रहण कमी झाल्याने वजन व मेद कमी होते आणि त्यामुळे मेदपेशी आकुंचन पावतात. मात्र, अतिरिक्त मेद जमा झाल्यामुळे ताणले गेलेले त्वचेचे आवरण त्या प्रमाणात आकुंचन पावत नाही. कपडे घातलेले असतात तेव्हा या व्यक्तींना वजन कमी झाल्याबद्दल छान वाटते पण कपड्याशिवाय ते स्वत:ला आरशात बघतात, तेव्हा ते निराश होतात.

स्त्रियांमध्ये सामान्यपणे ओटीपोट, मांड्या, हात व नितंबांवरील मेद कमी होते, शिवाय त्यांच्या स्तनांचे आकारमानाही लक्षणीयरित्या घटते. म्हणूनच, या भागातील त्वचा साधारणपणे सैल पडलेली दिसते. पुरुषांमध्ये पोट, छाती व नितंबांवरील मेद कमी होते, त्यामुळे त्यांचे हात व पाय सहसा छान आकारात दिसतात. अनेकजण वयस्कर दिसू लागतात, कारण, त्यांच्या चेहऱ्यावरील मेद नाहीसे झाल्याने चेहऱ्याची त्वचा ओघळते.

वजन कमी केल्यानंतर शरीराला आकार देण्यासाठी हे माहित आहे का?

लायपोसक्शन: वजन कमी झाल्यानंतर शरीर आकारात आणण्यासाठी साधारणपणे लायपोसक्शन व अतिरिक्त तसेच लोंबणारी त्वचा काढून टाकणे यांचे कॉम्बिनेशन केले जाते. ही प्रक्रिया प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी असते, कारण, प्रत्येकाचे वजन कमी होण्याचे क्षेत्र वेगळे असते व त्यानुसार गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणून, त्यांच्या गरजांनुसार प्रक्रियेची शिफारस केली जाते.

टमी टक: टमी टक किंवा बॉडी लिफ्ट प्रक्रिया करून डोक्याखालील शरीराची त्वचा घट्ट ओढली जाते, मांड्या थाय लिफ्ट प्रक्रियेद्वारे घट्ट केल्या जातात आणि स्तन/छातीची स्थिती स्त्रियांमध्ये ब्रेस्ट लिफ्ट आणि/किंवा ऑगमेंटेशनने सुधारली जाते. टमी टक (ओटीपोटावरील त्वचा घट्ट करणे), आउटर थाय लिफ्ट आणि बटक लिफ्ट सर्कमफेरेन्शिअल बॉडी लिफ्ट या एकत्रित प्रक्रियेद्वारे केले जातात. रुग्णाच्या स्वत:च्यात उती वापरून बटक ऑगमेंटेशन (नितंब फुगवणे) प्रक्रिया केली जाते. यात नितंब भरून काढली जातात, जेणेकरून ती सपाट दिसू नयेत व गोलसर आणि उभारयुक्त दिसावीत.

स्तन व हातांचे रिशेपिंग: बॉडी कोंटोरिंग प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात शरीराच्या वरील भागाचा समावेश होतो. यामध्ये स्तनांना आकार दिला जातो (ब्रेस्ट लिफ्ट आणि/किंवा स्त्रियांमध्ये एनलार्जमेंट व पुरुषांमध्ये स्तनाग्रांचे रिपोझिशन) तसेच हातावरील अतिरिक्त त्वचेला आकार दिला जातो. यामध्ये त्वचेचे सैल आच्छादन घट्ट केले जाते. त्यामुळे हात शरीराशी प्रमाणबद्ध दिसू लागतात. ही प्रक्रिया पहिल्या प्रक्रियेनंतर ६-१२ आठवड्यांनी केली जाते.

त्वचा पूर्वपदावर आणण्याच्या सर्व प्रक्रियेचा संबंध दृश्य वणांशी असतो. उत्तमरित्या प्रशिक्षित व अनुभवी सर्जन हे वण काही महिन्यांनंतर अस्पष्ट होतील अशा ठिकाणी ठेवतो. कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्यूटमधील टीमने भारतीय त्वचेवर (भारतीयांच्या त्वचेचा रंग सावळा असल्याने त्यावर वण ठळक दिसतात) अशा शेकडो शस्त्रक्रिया उत्तम परिणामांसह केल्या आहेत. तुमचे वजन कमी होण्याची प्रक्रिया स्थिर होत नाही तोवर या प्रक्रिया करवून घेऊ नका. वजनामध्ये कोणताही बदल न होता ३ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर ३ महिन्यांनी या प्रक्रियांचा विचार करा. शिवाय, या प्रक्रिया करवून घेण्यासाठी तज्ज्ञ व अर्हताप्राप्त सर्जनचीच निवड करा.

(डॉ.मोहन थॉमस, सिनियर कॉस्मेटिक सर्जन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here