घरलाईफस्टाईल'लेमन टी'चे सेवन करा आणि निरोगी रहा

‘लेमन टी’चे सेवन करा आणि निरोगी रहा

Subscribe

'लेमन टी'चे फायदे

अनेकांना चहा पिण्याची आवड असते. मात्र, या चहाच्या सेवनामुळे अनेक दुष्परिणामाना सामोरे जावे लागते. मात्र, जर तुम्ही चहा सोडू शकत नसाल. तर तुम्ही ‘लेमन टी’चे नक्की सेवन करु शकता आणि त्यामुळे तुम्ही निरोगी देखील राहू शकता. चला तर जाणून घेऊया ‘लेमन टी’चे फायदे.

पचनसंस्था निरोगी राहते

- Advertisement -

लेमन टीमुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहून तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर तजेलदार दिसता. तसेच लेमन टी प्यायल्याने पचनसंस्थेचे शुद्धीकरण होते. त्यासोबतच शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात.

सर्दी, तापावर उपयुक्त

- Advertisement -

लेमन टीमध्ये आले टाकून दिवसातून ३ – ४ वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. तसेच घशाची खवखव किंवा खोकला येत असल्यास लेमन टी एक रामबाण उपाय आहे.

श्वसनाचे आजार

लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत.

मानसिक स्थैर्य

लेमन टीमुळे पोट साफ राहते. त्यासोबतच जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स वाढतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी लेमन टी प्यायल्याने ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

शरीरातील साखरेवर नियंत्रण

दिवसातून तीन – चार वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रि राहते आणि कोलेस्टॉल देखील कमी होते.

वजन होते कमी

वजन कमी करण्यासाठी लेमन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. व्यायामासोबत योग्य आहार ठेवला तर वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होम्यास मदत होते. तसेच भूकेचेही प्रमाण नियंत्रित राहते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -