ब्रेड कटलेट

ब्रेड कटलेट रेसिपी

Mumbai

बऱ्याचदा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ब्रेड कटलेट नक्की ट्राय करा.

साहित्य

१० स्लाईस ब्रेड,
४ हिरव्या मिरचा
१/२ कप कोथिंबीर
१ तुकडा आले
मीठ चवीनुसार
१०० ग्रॅम चीज
तळण्याकरिता तेल

कृती

सर्व हिरवी मिरची आणि आले बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरुन१ चीज किसणीने किसून घ्या. त्यानंतर ब्रेडचे स्लाईस पाण्यात बुडवून लगेच काढून घेऊन हाताने दाबून त्याचे पाणी काढून त्यांना हाताने कुचकरा त्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, मीठ मिसळून एकत्र करा. थोडेसे मिश्रण हातावर घेऊन त्याच्या मधोमध चीज ठेऊन परत बंद करा चपटे लहान लहान कटलेट तयार करा. नंतर एका कढईत तेल गरम करून कटलेट तळून घ्या आणि गरम गरम कटलेट टमाटर सॉस आणि हिरव्या चटणी बरोबर खा.