बाळंतपणानंतर घ्यावयाची काळजी

Mumbai
Postnatal Care

सुदृढ बालकासाठी गरोदरपणात विशेष काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे बाळंतपणानंतरही नवजात आणि मातेच्या उत्तम आरोग्यासाठी आहारापासून, विहारापर्यंत काजळी घेणे गरजेचे आहे. अनेकदा बाळंतपणानंतर काजळी न घेतल्याने आईसह बाळाला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. तेव्हा बाळंतपणानंतर घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे.

सुडौल शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा –
बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे ढिले पडते. सैल पडते आणि त्याला काहीसे बेडौलपणा येतो. गर्भाशय पूर्वावस्थेला येऊ लागते. अशावेळी शरीराला काही शारीरिक हालचाल, व्यायामाची गरज असते. पडल्या पडल्या हातापायांची हालचाली करणे, पोटांच्या स्नायूचे आकुंचन, प्रसरण होतील हे पहाणे, उताणे झोपून पाय गुडघ्यात दुमडून सरळ वर खाली करणे, पाय सरळ सोडून ताठ बसून पायांचे अंगठे हाताच्या बोटांनी पकडणे अशा हालचाली खूपच लाभदायक होऊ शकतात. त्याचबरोबर दिर्घ श्वास घेणे, सोडण्याची कला ही शिकून घ्यावी. चालण्याचा व्यायामही करावा. काही सोपी योगासने फारच उपयोगी आहेत. उदा. मत्स्यासन, धनुरासन, सर्पासन, श्वसन परंतु अशी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत.

सकस व चौरस आहार घ्या
गरोदरपणासारखेच जन्मल्यानंतरही वाढीसाठी बाळ आईवरच अवलंबून असते. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटक मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूपच महत्त्व असते. तिच्या नेहमीच्या गरजा भागविण्यासाठी, बाळंतपणात शरीराची झीज भरून घेण्यासाठी, बाळाच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे घटक दुधात तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहारातूनच मिळतात.

दिवसातून नेहमीपेक्षा जास्त वेळा जेवले पाहिजे.
•मसालेदार, तिखट पदार्थ टाळा.
•बाळंतपणानंतर लगेचच गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत.
•कोणत्याही तणावाखाली वावरू नये.
•दूध भरपूर येण्यासाठी हळीव, डिंक, खारीक, खसखस, खोबरे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.

व्याधींकडे दुर्लक्ष नको –
बाळंतपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पुर्वावस्थेला येऊ लागते. या काळात ताप येणे, पोट साफ न होणे, लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाणे, पोटात दुखणे अशा व्याधी उद्भवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. थोड्याशा उपचारांनी या व्याधी बर्‍या होतात. तसेच स्तनात दूध साचू देऊ नये. ते काढून टाकावे नाहीतर गाठ बनते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here