घरलाईफस्टाईलझटपट सीताफळ बासुंदी

झटपट सीताफळ बासुंदी

Subscribe

फळ बाजारात सीताफळ हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सीताफळाचे वेगवेगळे पदार्थ घरोघरी बनवून त्याचा आस्वाद घेण्याची संधी खव्वयांना घेता येणार आहे.

साहित्य –

दूध-एक लिटर
भिजवलेल्या बदामाचे बारीक काप-
सीताफळ- १
वेलची पूड- १/२ चमचा
पाऊण किलो साखर इत्यादी.

- Advertisement -

कृत्ती –

*सिताफळाच्या बिया काढून त्याचा गर बाजूला वाटीत काढून ठेवावा.

*एक लिटर दूध घेऊन ते अर्धा लिटर होईपर्यंत मंद आचेवर आटवून घ्यावे.

- Advertisement -

*त्यानंतर त्यात भिजवलेले बारीक बदाम, वेलची पूड आणि पाऊण किलो साखर घालून मिश्रण एकजीव करावे.

*पुन्हा एकदा बासुंदी आटवून घेऊन थंड झाल्यानंतर त्यामध्ये एका सीताफळाचा गर घालून थोडावेळ घोटून घ्यावे. अशाप्रकारे चविष्ट बासुंदी घरच्या घरी तयार करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -