घरलाईफस्टाईलपावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

Subscribe

आपले सौंदर्य व आरोग्य जपण्यासाठी नेहमीचं महागड्या ट्रेंटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्सची गरज नसते. तर साधे घरगुती उपाय देखील फार फायदेशीर ठरतात

पायांना भेगा पडण्याच्या समस्या फक्त हिवाळ्यातच उद्भवते असे नाही तर अनेकांना पावसाळ्यात देखील पायांना भेगा पडतात. पायाची नीट काळजी न घेणे हे पाय फुटण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी नियमित पेडिक्युअर किंवा स्पा ची गरज नाही तर यावर घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात.

- Advertisement -

आपले सौंदर्य व आरोग्य जपण्यासाठी नेहमीचं महागड्या ट्रेंटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्सची गरज नसते. तर साधे घरगुती उपाय देखील फार फायदेशीर ठरतात. घरातील कितीतरी पदार्थ आरोग्यावर उपयुक्त असतात. मिठामुळे भेगा सौम्य होतील व मृत त्वचा निघून जाईल. तसेच त्वचेचे इन्फेकशन, जळजळ अशा त्रासाला आळा बसेल. मीठ हे जंतुनाशक असून अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. ब्लॅकहेडसच्या समस्येपासून पायाला पडलेल्या भेगा या सगळ्यांवर मीठ उपयुक्त ठरते.

अशी घ्या पायांची काळजी

  • रोज साबणाच्या पाण्याने पाय धुवावेत. त्यानंतर गार पाण्याने पाय धुवा. टॉवेलने पुसून पायांना क्रीम लावा.
  • पायाच्या टाचा नियमित घासाव्यात. त्यासाठी स्क्रबर वापरावे. त्यामुळे, तेथील मृत पेशी निघून जाऊन त्वचा मऊ होते.
  • झोपायला जाण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून, पुसून त्यावर मॉइश्‍चरायझर लावावे.
  • कोमट पाण्यात थोडे जाडे मीठ घालून त्यात १० मिनिटे पाय बुडवून ठेवा. पाण्यांना आराम मिळेल.
  • pumice stone ने पाय घासा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल. पाण्यात काही सुगंधी तेल देखील तुम्ही घालू शकता. तेलाने पावलांना हलकासा मसाज करा.
  • १५ मिनिटे पाय पाण्यात बुडवून ठेवा. नंतर मऊ टॉवेलने पाय सावकाश पुसा. हायड्रेटिंग लोशनने पायांना मसाज करा. मसाज करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन देखील वापरू शकता.
  • ग्लिसरीनमुळे त्वचेतील मॉइश्चर टिकून राहते. तसेच त्वचा मॉइश्चराईझ होऊन दीर्घ काळापर्यंत टवटवीत राहते. परंतु ग्लिसरीन लावण्याआधी कोमट पाण्यात साबण (लिक्विड सोप) किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड घालून पाय पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे पायातील घाण निघून जाईल व पाय स्वच्छ होतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -