गणेशोत्सव स्पेशल – मॉकटेल मोदक

गौरी - गणपतींना कालच आपण निरोप दिला. पण अनंत चतुर्दशी पर्यंत आपण गणेशोत्सव साजरा करणार आहोत. या गणेशोत्सवात आम्ही तुम्हाला पारंपरिक मोदकांव्यतिरिक्त इतर पद्धतीने लज्जतदार मोदक कसे तयार करायचे? हेही सांगितले. यामध्ये केळी, बेसन, तिळगूळ, पनीर आणि विविध फळांपासून चविष्ट मोदकांची रेसेपी दिली. पण आज मुक्ताच्या वाचकांसाठी मनरंगी रेस्ट्राची मॉकटेल मोदकाची खास रेसिपी दिली आहे.

Mumbai
Modak-Mocktail- (2)

साहित्य – व्हॅनिला आइस्क्रीम ५० ग्रॅम, गूळ २५ ग्रॅम, किसलेला नारळ ५० ग्रॅम, एक लहान चमचा तूप, चिमुटभर वेलची पावडर, एक ग्लास दूध, सुकामेवा.

Modak-Mocktail-

कृती – एका तव्यात तूप गरम करून घ्यावे, त्यात किसलेला नारळ परतवून घ्यावा. नारळाचा किस सोनेरी रंगाचा झाला की त्यात गूळ घालावं. गूळ चांगलं वितळलं की या मिश्रणात काजू, पिस्ता, बदाम किंवा आवडीप्रमाणे सुकामेका घालावा. सारं मिश्रण एकजीव करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. त्यात व्हॅनिला आइस्क्रीम आणि चिमुटभर वेलची टाकून मिक्सरमध्ये हे मिश्रण पुन्हा फिरवून घ्यावं. अशाप्रकारे मॉकटेल मोदक डिश तयार होईल. ही डिश गारेगार सर्व्ह करावी. सर्व्ह करताना मोदकाचं गार्निश करावं.


हेही वाचा – बाप्पासाठी खास मोदक