केस गळतायत ? हे करा घरगुती उपाय

आजकाल अनेकजण केस गळतीच्या समस्येने चिंतेत आहेत. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरच्या घरीही यावर उपाय करू शकतो. प्रदूषण, तणाव, केसांना नियमित तेल न लावणे, योग्य पोषण आहार न घेणे अशा अनेक कारणांमुळे केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.

Mumbai
Hair Fall

नैसर्गिक तेलाचा वापर

आपल्या केसांसाठी तेलाचे पोषण खूप आवश्यक आहे. यामुळे केस धुण्यापूर्वी केसांना तेल अवश्य लावावे. शक्यतो तेल गरम करून घ्यावे. कोमट तेल केसांच्या मुळांना व्यवस्थित लावावे. ऑलिव्ह, बदाम किंवा शुद्ध खोबरेल तेल केसांना लावावे. तेल लावल्यानंतर केस एका तासानंतर व्यवस्थित धुवावेत. केसांना नियमित तेल लावल्यास केस गळती कमी होते.

मेडिटेशन

मेडिटेशन आपली केस गळतीची समस्या रोखू शकते. चिंता आणि तणावामुळेही केस गळती होते. यामुळे नियमित मेडिटेशन केल्यास चिंता, तणाव यापासून दूर राहू शकतो आणि केस गळतीची समस्याही रोखू शकतो.

अ‍ॅटींऑक्सिडेंट

एक कप पाण्यात दोन बॅग ग्रीन टी मिसळून हे पाणी केसांच्या मुळांना लावावे. एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केस गळती थांबून केस मजबूत होतात.

नियमित मालिश

केसांना नियमित हलक्या हाताने मालिश करावे. यामुळे आपले केस निरोगी राहतात. मसाजसाठी शक्यतो बदामाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम.

नैसर्गिक ज्यूस

लसूण, कांदा अथवा आले यांचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. रात्री केसांना रस लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळेही केस गळतीची समस्या दूर होते.