घरलाईफस्टाईलतूरडाळीचे लाभदायी फायदे!

तूरडाळीचे लाभदायी फायदे!

Subscribe

जाणून घ्या तूरडाळीचे आरोग्यदायी फायदे.

बऱ्याचदा आहारात विविध भाज्या, कडधान्ये यांच्यासोबत विविध डाळींचा देखील समावेश असतो. तर बहुतांश भागात तुरीच्या डाळीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अगदी लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आहारात तूर डाळीचा समावेश असतो. त्याचप्रमाणे तूरडाळ ही आरोग्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची असते. चला तर जाणून घेऊया तूर डाळीचे आरोग्यदायी फायदे.

रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीर

anemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळते. त्याचप्रमाणे प्रसूती संदर्भातील विकार दूर करण्यासाठी तूरडाळीचे सेवन आवश्य करावे.

- Advertisement -

स्थूलतेवर नियंत्रण

तुरीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमध्ये कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि फॅटचे प्रमाण देखील कमी असते. तसेच या डाळीचे सेवन केल्यामुळे ऊर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो.

पचनात सुधारणा

पचन संस्था चांगली असल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. पचनासाठी सुलभ असणारे तंतुमय पदार्थ आहारात अधिक प्रमाणात असतील तर पोटात वायू होणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता आदि समस्या दूर होतात.

- Advertisement -

हृदयाचे आरोग्य

हृदयाच्या आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यात पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियमित राहण्यास मदत होते. तसेच शरीराचा रक्तदाब योग्य राहतो आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -