घरलाईफस्टाईलसंत्र्याचे असेही फायदे

संत्र्याचे असेही फायदे

Subscribe

हिवाळ्यातील प्रमुख फळांमध्ये संत्र्याचा अग्रक्रम लागतो. नारंगी फ्रेश रंगाचे संत्रे पोषक तत्वांचा खजिनाच आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस आदी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. दररोज एक संत्रे खाल्ल्याने व्यक्तीला व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवत नाही. सौन्दर्यप्रसाधनांमध्ये संत्र्याचा समावेश अवश्य आढळतो. पण या सौन्दर्यवर्धक संत्र्याचे इतरही आरोग्यदायी गुण आहेत, ते जाणून घेऊयात.

*दररोज एक संत्रे खाल्ल्याने व्यक्तीला व्हिटॅमिन सी ची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

- Advertisement -

*हिवाळ्यात लहान मुलांना गोड संत्र्यांचा ज्युस द्यावा. हे ज्युस टॉनिकप्रमाणे काम करते.

*दररोज संत्र्याच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. शिवाय डोळ्यांची जळजळ, हातापायांची जळजळ कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

*शरीरात नवीन पेशी तयार होण्यास संत्रे खाणे उपयुक्त ठरते.

*मूळव्याधीचा त्रास असलेल्यांनी संत्रे अवश्य खावे. रक्तस्त्राव रोखण्याची कमालीची क्षमता संत्र्यामध्ये असते.

*वाढत्या वयात त्वचा निस्तेज दिसू लागते. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहतो.

*हृदयरोग असलेल्यांनी संत्र्याचा रस मधासोबत घ्यावं, कमालीचा फायदा जाणवेल. तसेच संत्र्याच्या रसामुळे रक्तदाब व्यवस्थित राहण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -