घरलाईफस्टाईलदातांवरील पिवळेपणा झटपट करा दूर

दातांवरील पिवळेपणा झटपट करा दूर

Subscribe

दातांचा पिवळेपणा सहज दूर होण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा सहज दूर होण्यास मदत होते.

आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी चेहऱ्याप्रमाणे आपले दात देखील महत्तावाचे असतात. कारण समोरच्या व्यक्ती सोबत हसताना सर्वप्रथम दात दिसतात. त्यामुळे जर दात किडके किंवा पिवळसर असल्यास सौंदर्य कमी होते. यामुळे आपल्या दातांना शुभ्र ठेवणे तितकेच गरजेचे असते.

तुळस

तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत क्षमता असते. त्याचबरोबर तुळस तोंड आणि दातांच्या रोगांपासून दूर ठेवते. तुळशीच्या पानांना उन्हात सुकवून त्याची पावडर बनवून टूथपेस्टमध्ये मिसळून त्याने ब्रश केल्याने दात चमकण्यास मदत होते.

- Advertisement -

मीठ

मिठांमुळे दात स्वच्छ करण्याचा उपाय खूप प्राचीन आहे. मिटामध्ये दोन – तीन थेंब मोहरीचे तेल मिसळून दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

संत्र्याचे साल

संत्र्याचे साल आणि तुळशीची पाने कडक उन्हात सुकवून त्याची पावडर करुन घ्यावी. ही पावडर ब्रश केल्यानंतर दररोज या पावडरने दातांवर हलक मसाज करावे. संत्रात असेलेल व्हिटॅमिन्स सी आणि कॅल्शिअममुळे दात मोत्यांसारखे चमकू लागतात.

- Advertisement -

गाजर

जेवण झाल्यानंतर गाजराचे सेवन करावे. गाजर खाल्ल्याने पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. गाजरामध्ये असलेले फायबर दातांची चांगल्या तर्हेने स्वच्छता करतात.

लिंबू

लिंबामध्ये दातांना शुभ्र ठेवण्यात आणि बॅक्टेरिया संपवण्याचे गुण असतात. लिंबामध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-सेप्टिक आहे. नियमित लिंबाच्या काडीने दात स्वच्ष केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो. शिवाय दातांचे रोग देखील होत नाहीत.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पिवळे दात पांढरे शुभ्र बनवण्याचा सर्वात चांगला आणि घरगुती उपाय आहे. ब्रश केल्यानंतर बेकिंग सोडा घेऊन दातांना साफ करा. यामुळे दातांवर जमा झालेला पिवळेपणा हळू-हळू दूर होण्यास मदत होते.

पेरुची काडी

पेरुच्या कोवळ्या काडीने दात घासल्याने दात पांढरे शुभ्र होतात. ब्रश केल्यानंतर कोवळ्या पेरुच्या काडीने दात आणि हिरड्या घासाव्या यामुळे दात स्वच्छ होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -