घरलाईफस्टाईलनख वाढवण्यासाठी खास घरगुती उपाय

नख वाढवण्यासाठी खास घरगुती उपाय

Subscribe

नख वाढवण्यासाठी घरगुती उपाय

नखांचे सौंदर्य वाढवणे म्हणजे केवळ नेल आर्ट करणे नव्हे तर, आपल्या नखांना नैसर्गिकरित्या पोषण देऊन त्यांचे रूप खुलवणे होय. तुम्हाला नेल आर्ट करून तुमच्या नखांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर आधी त्यांना उत्तम पोषण मिळणे आवश्यक असते. त्यासाठी नखांची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. हातांची बोटं सुंदर दिसावी म्हणून बरेचदा स्त्रिया नखे वाढवताना दिसतात. मात्र, नखांची नीट काळजी घेतली नाही तर ती तुटतात. मात्र, जर लांब आणि सुंदर नख हवी असल्यास काही घरगुती उपाय केल्यास नख लांब आणि सुंदर होण्यास मदत होते.

नारळाचे तेल तुमची केवळ त्वचा आणि केसच नाही तर नखांसाठीदेखील फायदेशीर असते. त्यासाठी नारळाच्या तेलामध्ये थोडेसे मध आणि ४ थेंब रोझमेरी तेल घालून मिक्स करावे. हे मिश्रण थोडे गरम करून घ्यावे. त्यानंतर नखे १५ ते २० मिनिटे तेलामध्ये बुडवून बसावे. आठवड्यातून असे २ वेळा केल्यास, नख वेगाने वाढतात आणि मजबूतही होतात.

- Advertisement -

दूध आणि अंडं हे दोन्ही पदार्थ हाडे मजबूत करतात. त्यामुळे याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच नखांची मजबूती वाढवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. यासाठी तुम्हाला केवळ एका अंड्याचा सफेद भाग दुधामध्ये घालून फेटायचं आहे आणि यामध्ये ५ मिनिट्स तुमची नखं बुडवून ठेवा, असं केल्यामुळे तुमच्या नखांंना मजबूती मिळेल आणि वेगाने नखं वाढतील.

लसणाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर नखांचं पोषण आणि वाढीसाठीदेखील होऊ शकतो. लसणाची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा नखांवर लावल्यामुळे नखांना आवश्यक असणारं पोषण मिळतं.

- Advertisement -

नखं वाढण्यासाठी विटामिन सी खूपच फायदेशीर असतं. संत्र्यामध्ये विटामिन सी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यासाठी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिट्स नखं बुडवून ठेवावी. त्यानंतर अगदी हलक्या गरम पाण्याने नखं धुऊन त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

१ चमचा लिंबू रसामध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर १० मिनिट्स नखं यामध्ये बुडवून ठेवावीत. तुम्ही रोज जरी हे करू शकत असाल तर लिंबाचे तुकडे नखांवर घासावेत. असं केल्यास, नखं पटकन वाढतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -