घरलाईफस्टाईलआकस्मिक गर्भपात झाल्यास..

आकस्मिक गर्भपात झाल्यास..

Subscribe

आकस्मिक गर्भपात झाल्यास किंवा केल्यास महिला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील होतात. तज्ज्ञांच्या मते अशावेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कसे ते जाणून घेऊयात.

* भरपूर पेय पदार्थांचे सेवन करावे. कारण अशक्तपणामुळे महिला पुरेसे जेवण करू शकत नाहीत. तसेच पातळ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीराला कमी मेहनत करावी लागते.

- Advertisement -

* या काळात महिलांनी काही दिवसांसाठी व्यायाम करण्याचे टाळावे. अशा स्थितीत कमीत कमी दोन आठवडे आराम करावा. तसेच नोकरदार महिलांनीही याकडे विशेष लक्ष द्यावे.

* डॉक्टरांनी सांगितलेल्या अँटिबायोटिक्सचे सेवन नियमित केले पाहिजे.

- Advertisement -

* आहारात भरपूर जीवनसत्त्वांचा समावेश करावा आणि भरपूर झोप घ्यावी.

* या काळात शरीर अत्यंत अशक्त बनते, त्यामुळे कष्टाचे काम करू नये. तज्ज्ञांच्या मते सुमारे दोन आठवडे वजनदार वस्तू उचलू नये.

* आकस्मिक गर्भपात झाल्यानंतर शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी झाल्यावरच पुढच्या अपत्याच्या तयारीला लागावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -