घरलाईफस्टाईलझटपट ‘किचन टीप्स’

झटपट ‘किचन टीप्स’

Subscribe

रुचकर जेवणासाठी खास 'किचन टीप्स'

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • अनारसे तुपात टाकल्यानंतर विरघळू लागले तर मिश्रणात थोडी तांदळाची पीठी मिसळावी.
  • अनारसे तळताना जर अनारशांना जाळी कमी पडत आहे, असे वाटले तर खसखशित थोडी पिठीसाखर घालून त्यावर अनारसा थापावा.
  • घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
  • घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक अॅसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत.
  • मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राईंड कराव.
  • कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
  • आलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी बऱ्याचवेळा खराब होतं. ते चांगलं रहावं म्हणून त्याची माती चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून टाकावे, नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत वाळवावे आणि झिप लॉक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. महिनाभर सहज टिकतं.
  • पावसाळ्यात दमट हवेमुळे नमकीन (फरसाण) मऊ पडतं आणि त्यामुळे कोणीही खायला तयार नसते, अशा वेळी त्याचा वापर करून नमकीनचे कटलेट करावे. छान लागतात.
  • कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर त्यात एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरणार नाही.
  • मशरूम (अळिंबी) हे एखाद्या स्पंज सारखे असल्याने पाण्यात घालून धुतले तर पाणी शोषून घेतात, म्हणून मशरूम स्वच्छ करतेवेळी एखाद्या ओल्या मऊ सुती कपड्याचा वापर करुन हळुवारपणे फक्त पुसून घ्यावेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -