घरलाईफस्टाईलभारतीयांना सतावतेय गुडघेदुखी?

भारतीयांना सतावतेय गुडघेदुखी?

Subscribe

सध्या भारतात गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे. तसेच यामध्ये २० ते २५ टक्क्यांने वाढ झाली आहे. यावर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे आहे.

गुडघा हा मांडीचे हाड आणि नडगीचे हाड यांच्यातील सांधा असतो आणि त्याच्या पुढील बाजूस वाटी असते. गुडघ्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला स्थैर्य मिळते आणि लवचिकता येते. शरीरातील हाडे आणि सांधा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, ‘आर्थरायटिस’ संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या निर्माण होते. सांधा म्हणजे गुडघा हा सुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधीबंधांनी तयार होतो. गुडघ्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरू होते. संधिवातामुळे सांध्यातील वेदना सुरू होतात. हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखीही निर्माण होते.

९० टक्के लोकांना ऑस्टिओआर्थरायटीस

भारतात, रुग्णालयात दाखल होणाऱ्या दहापैकी चार रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास असतो. ६० वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये जवळपास ९० टक्के लोकांमध्ये काही प्रमाणात ऑस्टिओआर्थरायटीस आहे. ४५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक गुडघेदुखीवर उपचार घेत असल्याचे दिसून येते. जगभरात ऑस्टीओआर्थरायटिसने पिडीत रुग्णांची संख्या वाढत असून गुडघेप्रत्यारोपणाकडे रुग्णांना अधिक कल असल्याचे दिसून येते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तीस कोटी लोकसंख्या असलेल्या युएसएमध्ये १० लाख रुग्णांनी गुडघे प्रत्यारोपण केल्याचे दिसून येते. भारतातही वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास यापुढे गुडघे प्रत्यारोपणाला अधिक मागणी असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

ऑस्टिओआर्थरायटीसच्या रुगणांत वाढ

अलिकडच्या काळात अगदी तरुण वयामध्ये गुडघ्याच्य ऑस्टिओऑर्थरायटीस आजाराचे निदान झालेल्या पेशंटचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. बैठी जीवनशैली आणि गुडघ्यांना होणाऱ्या दुखापतींमुळे नवतरुणांमध्ये गुडघ्याचा आजार बळावत चालल्याचे दिसून येत आहे. आता अगदी पंचवीस वयापर्यंतचे पेशंट उपचारांसाठी डॉक्टरकडे येतात. ऑस्टिओआर्थरायटीसच्या पेशंटच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रतिबंध आणि उपचार प्राथमिक स्वरूपाचे आहेत. गुडघ्याचा अतिवापर किंवा थेट दुखापती टाळ . योग्य पादत्राणे वापरा. सर्व स्नायूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्या आणि जिममधील व्यायामांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. गुडघ्याच्या पुढील भागात सतत वेदना होत असतील, तर ऑर्थोपेडिक किंवा गुडघेविकार तज्ज्ञांना भेटा. थोडक्यात, तुम्ही शारीरिक हालचाली करत असाल तर दुखापतीचा धोका असतोच.

लठ्ठपणा आणि गुडघेदुखी

आपलं वजन नियमितपणे तपासत रहा. ते अधिक असेल तर तातडीनं दखल घेऊन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करा. ऑस्टिओआर्थ्रायटिससाठी अतिरिक्त वजन हा अत्यंत घातक घटक आहेच. कारण वजनाचा अतिरिक्त ताण हाडांवरच येतो आणि त्यातूनच सांध्यांचं कार्टिलेज फाटू लागतं. म्हणूनच अतिरिक्त वजन असलेल्या आणि लठ्ठ व्यक्तींना तरुणपणीच संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

- Advertisement -

झिज होऊन सांधे दुखणे-सुजणे याचे भारतात प्रमाण अधिक आढळते. गुडघ्यावर याचा आघात होतो. कारण गुडघा हा सर्वाधिक मार आणि भार सोसत असतो. गुडघ्याची हालचाल सर्वाधिक होत असते. धावणे, पळणे, उड्या मारणे, वजन उचलणे यामध्ये गुडघ्याची झिज होते. त्यामुळेच भारतात गुडघ्यांचा संध‌विात अधिक आढळतो.

भारतीयांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण अधिक

तज्ञांनी केलेल्या अभ्यानुसार जपान आणि स्वित्झलॆडच्या तुलनेत झिज होऊन सांधे दुखणे-सुजणे याचे भारतात प्रमाण अधिक आढळते. गुडघ्यावर याचा आघात होतो. कारण गुडघा हा सर्वाधिक मार आणि भार सोसत असतो. गुडघ्याची हालचाल सर्वाधिक होत असते. धावणे, पळणे, उड्या मारणे, वजन उचलणे यामध्ये गुडघ्याची झिज होते. त्यामुळेच भारतात गुडघ्यांचा संध‌विात अधिक आढळतो. तासनतास कम्प्युटरवर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणाऱ्यांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले आहे.

डॉ मितेन शेठ, अस्थिविकार आणि गुडघेविकार शल्यविशारदम

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -