घरलाईफस्टाईलसायंकाळचा नाश्ता : मटार चाट रेसिपी

सायंकाळचा नाश्ता : मटार चाट रेसिपी

Subscribe

मटार चाट रेसिपी

बऱ्याचदा सायंकाळी भूक लागली का नाश्ता काय करावा हा प्रश्न पडतो. मात्र, अशावेळी जर तुमच्या घरात मटार असतील तर तुम्ही मटार चाट नक्की करु शकता.

साहित्य

- Advertisement -
  • भिजवलेले वाटाणे
  • उकडलेला बटाटा
  • कापलेला बारीक कांदा
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • जीरे पावडर
  • धणे पावडर
  • तिखट
  • लिंबू

कृती

रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा. त्यानंतर वाटाणे आणि बटाटी चांगली उकडून घ्या. वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसे मीठ घाला. त्यानंतर चांगले कुस्करुन त्यात उकडलेले वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धणे आणि जिरे पावडर अथवा चाट मसाला घाला. हवं असल्यास, पापडाचा चुरा आणि गोड अथवा तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता. अशाप्रकारे सायंकाळचा मटार चाट नाश्ता तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -