घरलाईफस्टाईलपुरूषही वाढत्या स्तनाच्या समस्येने त्रस्त, आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याकडे कल

पुरूषही वाढत्या स्तनाच्या समस्येने त्रस्त, आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याकडे कल

Subscribe

पुरूषांच्या स्तनांची प्रमाणाबाहेर वाढ ही एक गंभीर समस्या नसली तरी विशिष्ट वयोगटात अन् खासकरून पौगंडावस्थेत मुलांना ती त्रासदायक वाटू शकते.

स्तनांची वाढ होणे हे कोणत्याही पुरुषासाठी पेचप्रसंग निर्माण करणारे ठरू शकते. पुरूषांच्या स्तनांची प्रमाणाबाहेर वाढ (गनीकोमास्टीया) म्हणजे मुलं किंवा पुरूष यांच्यामध्ये स्तनाची मेदयुक्त वाढ होणं. लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणाऱ्या संप्रेरकांचा असमतोल झाल्याने ही वाढ होते. कि-होल शस्त्रक्रियेमुळे आता स्तनाचा आकार कमी करता येऊ शकतो त्यामुळे या पर्यालाला अधिक पसंती मिळते आहे. पुरूषांच्या स्तनांची प्रमाणाबाहेर वाढ ही एक गंभीर समस्या नसली तरी विशिष्ट वयोगटात अन् खासकरून पौगंडावस्थेत मुलांना ती त्रासदायक वाटू शकते. अशी मुलं किंवा पुरूष यांना छातीत गाठ जाणवणं, ती गाठ दुखणं अशी लक्षणं दिसू लागतात. अयोग्य स्तनवाढीमुळे मित्र मंडळींकडून सारखे चिडवलं जाणं, त्यामुळे बाहेर खेळायला न जाणं, साहजिकच त्या अनुषंगाने आलेला एकटेपणा या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. १८ वर्षीय अनिष झा(नाव बदललेले आहे) याला देखील स्तनवाढीची समस्या सतावू लागली होती. तो १५ वर्षाचा असतानाच त्याला स्तनवाढीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामूळे तो बाहेर खेळायला जाणे, मित्रासोबत फिरायला जाणे टाळू लागला होता. त्याची मित्रांमध्ये खिल्ली उडविली जात असल्याने हळूहळू तो तणावाखाली जात असल्याचे चित्र दिसून आले. त्यांनी डॉ मोहन थॉमस, कॉस्मेटीक सर्जन, कॉस्मेटीक सर्जरी इन्स्टीट्युट यांची भेट घेतली व त्यांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वजन कमी करणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असून त्याच्या पालकांनाही याची कल्पना देण्यात आली.

शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण वाढले

अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर त्याच्या पालकांनी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी सहमती दर्शविली आणि मुलाने ६ महिन्यांत ४५ किलोपेक्षा जास्त वजन कमी केले. तो सडपातळ दिसू लागला, व्यायाम करु लागला आणि हळूहळू त्याने आपला आत्मविश्वास परत मिळवला. अत्याधुनिक अशा लायपोसक्शन पद्धतीने आता हे करणं अधिक सोपं झालंय. त्यानंतर त्याला पुर्ववत होण्याकरिता तसेच स्तनांचा आकारा सामान्य असावा याकरिता ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये शरीराला पूर्ण भूल दिल्यानंतर सूक्ष्म अशा छिद्रामधून स्तनाच्या अवतीभवती असलेली चरबी शोषून घेतली जाते. यानंतरही जो भाग कमी झाला नाही तो पण आवश्यकता जाणवल्यास एका छोट्या छिद्रातून बाहेर काढला जातो. या शस्त्रक्रियेच्या पद्धतीमध्ये कमीत कमी व्रण छातीवर राहील याची काळजी प्लास्टिक सर्जन घेतात. शस्त्रक्रियेबाबत लोकांमध्ये असलेली जनजागृती तसेच समाजात वावरताना मनात कसलाही न्युनगंड बाळगावा लागू नये याकरिता ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉ मोहन थॉमस, कॉस्मेटीक सर्जन, कॉस्मेटीक सर्जरी इन्स्टीट्युट सांगतात, ही शस्त्रक्रिया डे केअर सर्जरी (हॉस्प‌टिलमध्ये राहण्याची गरज नाही) म्हणून पण केली जाऊ शकते. चरबी काढून घेतलेल्या जागी पाणी किंवा रक्त जमा होऊ नये आणि तिथली सूज कमी व्हावी यासाठी शस्त्रक्रिये नंतर लगेचच कम्प्रेशन ड्रेसिंग केलं जातं. दोन ते तीन दिवसानंतर ते बदलून कम्प्रेशन गारमेंट दिलं जातं. शस्त्रक्रियेनंतर ४ ते ५ दिवस हलकं दुखणं जाणवू शकतं जे वेदनाशामक औषधं (Analgesics) घेऊन कमी होतं. पाच ते सहा दिवसांनंतर दैनंदिन कामाला सुरूवात केली जाऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -