घरलाईफस्टाईलआहारातील साखर - मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे!

आहारातील साखर – मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे!

Subscribe

साखर-मीठाशिवाय भारतीय पदार्थांना चवच नाही. त्यामुळे आपल्या आहारात त्याचा कमी-जास्त प्रमाणात समावेश केला जातो. मीठाचे पचन झाल्यानंतर त्याचे रूपांतर सोडियम आणि क्लोराईडमध्ये होते. सोडियममुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास तर क्लोराईडमुळे पचन सुधारातून आहारातील पोषणद्रव्यं शोषून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. तर साखर हे कार्बोहायड्रेट्सचे एक रूप असून पचनानंतर त्याचे ऊर्जेत रूपांतर होते.

रिफाईन्ड साखर खाल्ल्याने वजनही वाढू शकते. ‘अति तेथे माती’ या नियमानुसार, साखर किंवा मीठही अति खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते. अति मीठामुळे रक्तदाब, हृदयाचे विकार वाढू शकतात. कळत नकळत तुमच्या आहारात मीठ-साखर अति जाते. त्यातून अनेक आजारांचा धोका वाढतो. हृदयविकार हे सायलंट किलर असल्याने त्यांना वेळीच ओळखणे कठीण असते.

- Advertisement -

साखर आणि मीठ प्रमाणात खाण्यासाठी या हेल्दी मार्गाने त्यावर नियंत्रण मिळवा.

* फळं आणि भाज्या खाव्यात. किमान निम्मी प्लेट फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश असावा. त्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स मिळतील. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच त्यामधून मिळणारे पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात तर फायबर घटक प्रोसेस्ड फूड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात. तसेच कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

* तुमच्या अवेळी खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवा

- Advertisement -

चिप्सचे पाकीट किंवा आईस्क्रीम खाण्याच्या इच्छा अनेकांना रोखणं कठीण होते. यामधून शरीराला केवळ अतिरिक्त प्रमाणात साखर किंवा मीठाचा पुरवठा होतो. त्यामुळे कॅलरीज वाढतात.

आरोग्यदायी घटकांचा पुरवठा होत नसल्याने खारावलेला सुकामेवा, चिप्स, स्वीटन टी, सोडायुक्त पदार्थ टाळावेत. वेळी अवेळी भूक लागल्यास शक्यतो घरगुती पदार्थांचेच सेवन करावे.

वेळी अवेळी भूक लागल्यास विकतचे खारवलेले किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा सलाड, सॅन्डविच किंवा फळं खावीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -