घरलाईफस्टाईलकुष्ठरोगाच्या जनजागृतीसाठी 'स्पर्श' मोहीम

कुष्ठरोगाच्या जनजागृतीसाठी ‘स्पर्श’ मोहीम

Subscribe

कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढावी म्हणून डिसेंबर ते जानेवारी या महिन्यादरम्यान 'स्पर्श' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मुले कुष्टरोग्यांना नीट वागणूक देण्याची शपथ घेणार आहेत.

कुष्ठरुग्णांविषयी समाजात असलेला गैरसमज आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, त्यासोबतच नव्या पिढीमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढावी, यासाठी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यादरम्यान ‘स्पर्श’ मोहीम राबवली जात आहे. २४ डिसेंबर ते ७ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम मुंबईच्या २४ वॉर्डमध्ये राबवली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही विशेष मोहीम महापालिकेच्या शाळांसह आणि खासगी शाळांमध्येही राबवली जाणार आहे. शाळेतील १० ते १५ या वयोगटातील मुलांना कुष्ठरोग म्हणजे काय? तो कसा पसरतो? आणि कुष्ठरुग्णांप्रती आपली काय भूमिका असली पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासोबतच, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ही मुलं शपथ घेणार आहेत.

मुल घेणार शपथ

कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन, जर त्याला कुष्ठरोगाचे निदान झाले तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची दक्षता घेईन, शिवाय, जे कुष्ठरुग्ण आढळतील त्यांच्याशी सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहील, अशी शपथ ही मुलं घेणार आहेत.

- Advertisement -

“३० जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. २०२० पर्यंत केंद्र सरकार कुष्ठरोगाच्या समुळउच्चाटनासाठी प्रयत्न करत आहे. समाजात आजही कुष्ठरोगाविषयी गैरसमज आहेत. जर कुष्ठरोगाची लक्षणे दिसायला लागली आणि तात्काळ निदान आणि उपचार केले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे हा गैरसमज कमी झाला पाहिजे. यासाठी ही स्पर्श मोहीम राबवली जात आहे.” – डॉ.राजू जोटकर, आरोग्य सहाय्यक संचालक, कुष्ठरोग मुंबई

कुष्ठरुग्णांचं प्रमाण झालं कमी 

२००७ ते २०१८ या गेल्या १० वर्षांत कुष्ठरुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. २०१७- १८ मध्ये एकूण ४३२ नवीन कुष्ठरुग्ण आढळले आहेत. जे गेल्या १० वर्षांच्या तुलनेत कमी आहेत. त्यापैकी १६१ असांसर्गिक रुग्ण आहेत आणि २७१ सांसर्गिक रुग्ण आढळले. तर, लहान मुलांमध्येही कुष्ठरोगाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी एकूण ५८ मुलांमध्ये कुष्ठरोग आढळला आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -