घरलाईफस्टाईल'हे' उपाय करा घरात पाल दिसणारही नाही

‘हे’ उपाय करा घरात पाल दिसणारही नाही

Subscribe

घरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी देखील अनेक निरनिराळ्या प्रकारच्या जीवजंतू, किटक आणि किड्यांचा घरामध्ये प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या जीवजंतूचा वावर आरोग्याच्या द्रुष्टीने घातक असतो. या अपायकारक जीवांमुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. विशेषत: पाल बऱ्याचदा घराच्या भिंतीवर आढळून येते. बरेच रासायनिक औषधे वापरुन देखील घरातील पाल निघून जात नाही, अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास पालीला घालवण्यासाठी मदत होऊ शकते.

काळ्या मिरीचा स्प्रे

- Advertisement -

जेवणात वापरल्या जाणाऱ्या काळ्या मिरीची पूड करुन ती एका स्प्रे असलेल्या बाटलीट भरा. त्यामध्ये पाणी आणि साबण मिसळून पाल असलेल्या सर्व कोपऱ्यांमध्ये ते पाणी स्प्रे करा. यामुळे पाली दूर होतात.

कांद्याचा रस

- Advertisement -

कांदा बारीक कापून त्याची मिक्सरला पेस्ट करावी. त्यानंतर ती पेस्ट गाळून त्याचे पाणी एका स्प्रेच्या बाटालीत भरुन ज्या ठिकाणी पाली येतात. त्याठिकाणी स्प्रे करावे. यामुळे पाली येत नाहीत.

अंड्याची टरफले

अंड्याची टरफले सुद्धा पालींना घालवण्यासाठी खूप पूर्वीपासून वापरली जातात. पाली असलेल्या ठिकाणी अंड्याची टरफले लटकवली जातात.

लसूण

लसूणच्या उग्र वासामुळे सुद्धा पालींना घरातून काढले जाऊ शकते. पालींचा त्रास दूर करण्यासाठी कांदा आणि लसणाचा रस एकत्र करुन त्याचा स्प्रे करावा.

कॉफी पावडर

कॉफी पावडर सुद्धा पाली घालवण्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे. त्यासाठी कॉफी पावडर आणि पाण्याचे मिश्रण एकत्र करुन घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये लावून ठेवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -