घरलाईफस्टाईलतांदळाचा 'फेसपॅक'

तांदळाचा ‘फेसपॅक’

Subscribe

कुठेही फिरायला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असल्यास आपला चेहरा उठून दिसावा, असे अनेक तरुणींना वाटते. त्याकरता बऱ्याच तरुणी पार्लरमध्ये जाऊन आपल्या चेहऱ्याला अनेक प्रोडक्ट लावून आपला चेहरा उजळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, घरच्या घरी देखील तुम्ही तुमचा चेहरा चमकवू शकता. चला तर जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी खास ‘फेसपॅक’.

व्हाईट मास्कसाठी लागणारे साहित्य

  • तांदळाचे पीठ
  • दोन चमचे गुलाब जल
  • १ इ व्हिटामिन कॅप्सूल
  • दीड चमचा दही

असा तयार करा फेसपॅक

- Advertisement -

सर्वप्रथम दोन चमचे तांदळाचे पीठ घ्यावे. त्या पिठात गुलाब जल, दही, व्हिटामिन कॅप्सूल घालून एकजीव करुन घ्यावे. नंतर चेहरा स्वच्छ करुन हा तयार फेसपॅक चेहऱ्याला लावा. काहीवेळाने चेहऱ्यावरील फेसपॅक सुकल्यानंतर हातावर पाणी घेऊन पुन्हा एकदा चेहरा स्क्रब करुन घ्यावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. या फेसपॅकमुळे चेहरा चमकण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -