घरलाईफस्टाईलट्राय करा हेल्दी साबुदाणा इडली

ट्राय करा हेल्दी साबुदाणा इडली

Subscribe

नेहमी तयार करत असलेल्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळे हवे असल्यास हा वेगळा प्रयोग नक्की करा

घरात कोणाचाही उपवास असला की, उपवासाचा कोणता पदार्थ करावा याचा नेहमीच प्रश्न पडत असतो. नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणे वडे खाऊन आणि तयार करून कंटाळा आला असेल तर साबुदाण्याची इडली हा नवा पदार्थ नक्की ट्राय करा. साबुदाण्याची इडली तयार करण्याची कृती आणि साहित्य खालील प्रमाणे –

- Advertisement -

साहित्य :

अर्धी वाटी साबुदाणा, १ वाटी इडलीचा रवा, पाव वाटी गोड दही, साखर, मीठ.

कृती :

  • टेस्टी साबुदाणा इडली तयार करण्यासाठी साबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करून घ्या.
  • त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या तयार करा.
  • नेहमी तयार करत असलेल्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळे हवे असल्यास हा वेगळा प्रयोग नक्की करून पाहा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -