पिठाला किड लागलीय? ‘हे’ करा उपाय

पिठाला किड लागू नये, म्हणून काय करु शकतो.

पिठाला किड लागलीय? 'हे' करा उपाय

मैदा, रवा आणि हरभरा पिठाला बऱ्याचदा किड लागते, अशावेळी हे पीठ कुठे ठेवावे, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. कारण काही दिवसातच यामध्ये किटक आणि अळ्या होऊ लागतात. यामुळे या गोष्टींचा साठा घरात कमीच करावा लागतो. पण, या पिठाला किड लागू नये, म्हणून काय करु शकतो. ते आज आपण पाहणार आहोत.

गव्हाचं पीठ

गव्हाचं पीठ सुरक्षित ठेवण्यासाठी पिठात कडुलिंबाची पाने ठेवून द्या, असे केल्यास पिठात मुंग्या आणि गव्हातला माइट लागणार नाही. तसेच कडुलिंबाची पाने नसल्यास, त्याचा ऐवजी तेजपान किंवा मोठी वेलची देखील वापरू शकता.

रव्याचा सांजा

रवा आणि गव्हाचा सांजा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला कढईत चांगले भाजून घ्यावे. थंड झाल्यावर यामध्ये ८ ते १० वेलची घालून एखाद्या घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवून द्या, असे केल्यास कीटक आणि आळ्या होणार नाहीत.

हरभऱ्याच्या डाळीचे पीठ

मैद्यात आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात पटकन किडे लागतात. किड लागण्यापासून वाचविण्यासाठी आपण हरभराच्या डाळीचे पीठ आणि मैद्याला एका डब्यात ठेवून त्यामध्ये मोठी वेलची टाकून द्या. यामुळे किडे लागणार नाही.

तांदळाला पडणारे किडे

तांदळाला आद्रता आणि बारीक किडे लागण्यापासून वाचविण्यासाठी १० किलो तांदुळात ५० ग्रॅम पुदिन्याची पाने घालून ठेवा, यामुळे तांदुळात किडे होणार नाही.

डाळीला लागणारी किड

डाळीला कीड लागते तेव्हा डाळी आणि हरभऱ्यात कोरडी हळद, हळकुंड आणि कडुलिंबाची पाने घालून ठेवू शकता. यामुळे किडे होणार नाही.