‘हा’ फेसपॅक तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवेल

त्वचेला चमक आणण्यासाठी ग्लिसरीन आणि हळद फेसपॅक

Mumbai
turmeric glycerine pack for shiny skin
ग्लिसरीन आणि हळद फेसपॅक

तुमच्या चेहऱ्याला चमक आणायची असल्यास ग्लिसरीन आणि हळद हा फेसपॅक उत्तम काम करेल. त्यामुळे कुठे बाहेर जायचे आहे आणि चेहरा काळवंडला असेल तर हा फेसपॅक नक्की ट्राय करा. चला तर मग हा फेसपॅक कसा बनवायचा पाहूया.

साहित्य

अर्धा किंवा एक चमचा ग्लिसरीन
एक चिमूटभर हळद
एक चमचा मध

वापरण्याची पद्धत

ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा हे वापरणे योग्य ठरेल.

हे कसे कार्य करते?

ग्लिसरीन आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्वचेला चमकदार आणण्यास मदत करते.


हेही वाचा – त्वचा निरोगी राहण्यासाठी ‘बनाना’ फेसपॅक