घरलाईफस्टाईलInternational Yoga Day 2019: योगसाधना करताय; अशी घ्या काळजी!

International Yoga Day 2019: योगसाधना करताय; अशी घ्या काळजी!

Subscribe

जीवनामध्ये आनंदी, यशस्वी, समाधानी कसे व्हायचे याचे रहस्य योगसाधनेत दडलेले आहे.

भारतीय संस्कृतीचे मूळ असणारा ‘योग’ याचा प्रचार आणि प्रसार जगभर झालेला आहे. जीवनामध्ये आनंदी, यशस्वी, समाधानी कसे व्हायचे याचे रहस्य योगसाधनेत दडलेले आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योग करण्याचे फायदे लक्षात आल्यानंतर योगा करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. त्यामुळे योगा करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे अशी घ्या, योगसाधना करताना काळजी…

योगसाधना करताना घ्यायची काळजी

1. योगसाधना प्रथमच करताना योगाबद्दल विशेष जाणून घ्या. तसेच, इंटरनेट तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योगा बद्दल अधिक माहिती जाणून घ्या. योगाबद्दल चुकीची माहिती दिल्यास तसेच चुकीच्या पद्धतीने योगा केल्यास त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो.

- Advertisement -

2. योगा करण्यासाठी ठराविक वयोगटातील व्यक्तींनी करावे असा कोणता नियम नाही, तरी देखील तीन वर्षाहून मोठी असणारी व्यक्ती सहज योगसाधना करू शकते.

3. महिला गरोदर असताना त्या महिलेने कपाल भारती सारखे कठीण प्राणायम करू नये. तसेच, महिलांनी मासिक पाळीच्या काळात आणि महिलेच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर साधारण ३ महिने आणि सिझर झाल्य़ानंतर ३ महिने कोणत्याही प्रकारचे प्राणायम किंवा योगा करू नये.

- Advertisement -

4. शक्यतो योगा करताना सकाळच्या प्रातःकाळी, तसेच वातावरणात शांतता असेल तेव्हा करावा. मोकळ्या किंवा नैसर्गिक हवेमध्ये शक्यतो करा.

5. योगा करण्यासाठी घरात एखादी वेगळी खोली असेल तर उत्तम. मात्र तशी व्यवस्था नसेल तर, घरातील एक शांत ठिकाण निवडा. योगा करताना मनास शांती मिळेल असे संगीत सुरू ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -