घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटसाहेबांचा हार्दिक वाढदिवस!

साहेबांचा हार्दिक वाढदिवस!

Subscribe

…साहेबांच्या स्विय सहाय्यकाने साहेबांच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मुंडकं मागवलं…मुंडकं मागवलं म्हणजे गैरसमज करून घेऊ नका…प्रत्येकाचा मुंडक्याएवढाच म्हणजे फक्त डोक्याचा फोटो मागवून घेतला…
…साहेबांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर साहेबांच्या भल्याथोरल्या फोटोखाली ही सेवाभावी डोकी छापायची होती…
…प्रत्येक होर्डिंगवर झळकणार्‍या ह्या किमान अर्धा डझन सेवाभावी डोक्यांशिवाय साहेबांच्या फेटेधारी मस्तकाला शोभा येणार नव्हती…

आचारसंहिता लागण्यापूर्वी साहेबांचा वाढदिवस येणं ह्यासारखा साहेबांच्या आयुष्यातला भाग्याचा दुसरा क्षण नव्हता.
…साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांच्या नावाचा लखलखाट करता येण्याची संधी निवडणुकीच्या तोंडावर मिळणार म्हणून साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकमेकाला तळहात लाल होईपर्यंत टाळी दिली…
…साहेबांच्या स्विय सहाय्यकाने साहेबांच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मुंडकं मागवलं…मुंडकं मागवलं म्हणजे गैरसमज करून घेऊ नका…प्रत्येकाचा मुंडक्याएवढाच म्हणजे फक्त डोक्याचा फोटो मागवून घेतला…
…साहेबांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर साहेबांच्या भल्याथोरल्या फोटोखाली ही सेवाभावी डोकी छापायची होती…
…प्रत्येक होर्डिंगवर झळकणार्‍या ह्या किमान अर्धा डझन सेवाभावी डोक्यांशिवाय साहेबांच्या फेटेधारी मस्तकाला शोभा येणार नव्हती…साहेब वर, डोकी खाली हा होर्डिंगवरचा प्रोटोकॉल प्रत्येक होडिर्ंंगवर पाळावा लागणार होता…
…साहेबांना नुसत्या हार्दिक, लाख लाख, कोटी कोटी शुभेच्छा देऊन भागणार नव्हतं…त्यासाठी कोणत्याही लेखक, कवीची प्रतिभा कोलमडून पडावी अशी विशेषणं शुभेच्छांच्या आधी जोडावी लागणार होती…ह्रदयस्पर्शी शुभेच्छा, भावस्पर्शी शुभेच्छा, सप्तरंगी शुभेच्छा अशा नव्या अतिकल्पक शुभेच्छा आयात कराव्या लागणार होत्या…
…वाढदिवसाची होर्डिंग्ज ही खरंतर येणार्‍या निवडणुकीची नेपथ्यरचना होती…त्यामुळे साहेबांनीच स्वत:हून वाढदिवसाच्या केकपासून होर्डिंग्जपर्यंत पुढाकार घेतला होता…
…ही होर्डिंग्ज अशी चमचमती, लखलखती होती की त्या होडिर्ंंग्जकडे पाहिल्यावर कुणालाही वाटावं की ह्या देशातलं दु:ख, दैन्य आता औषधालाही उरलेलं नाही, सगळीकडे सुखाच्या राशी ओसंडून वाहताहेत…
…तर हां हां म्हणता साहेबांचा वाढदिवस एकदाचा उगवला…आणि लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या वधूवराप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या कार्यालयात साहेब अगडबंब पुष्पगुच्छ स्विकारायला सज्ज झाले…

- Advertisement -

…साहेबांना पुष्पगुच्छामागून पुष्पगुच्छ येत होते…एखाद दुसरा साहेबांचा डोळा चुकवून तिथलाच पुष्पगुच्छ उचलून साहेबांना देत होता…वाढदिवसाच्या धुनकीत ही नजरबंदी साहेबांना कळूनही येत नव्हती…
…वाढदिवस संपत आला तशी पक्षश्रेष्ठींची स्कॉर्पियो येऊन साहेबांच्या कार्यालयाकडे येऊन थांबली…
…पक्षश्रेष्ठींनी सुहास्यमुद्रेने साहेबांना पुष्पगुच्छ दिला तेव्हा साहेबांना स्वत:च्याच वाढदिवसासाठी स्वत:च घेतलेल्या परिश्रमाचं सार्थक झाल्याचं वाटलं…
…पण जेव्हा साहेबांना पक्षश्रेष्ठींनी पुढची बातमी दिली तेव्हा साहेब श्रध्दांजलीला उभे राहिल्यासारखे ताठ झाले…
…पक्षश्रेष्ठी म्हणाले, तुमचा हा मतदारसंघ आपल्या आघाडीच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात आलाय…
…पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय ऐकला आणि साहेबांनी कार्यकर्त्यांना आपल्यासमोरचा एकेक पुष्पगुच्छ आपापल्या घरी न्यायला सांगितला…आणि कोणत्या तरी बाबाने सांगितला म्हणून सकाळपासून धरलेला उपासही तात्काळ सोडला…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -