घरमहा @२८८मेहकर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २५

मेहकर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २५

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (विधानसभा क्र. २५) विधानसभा मतदारसंघ आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हा क्रमांक २५ वा विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या २५ वर्षांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघात शिवसेनेचाच झेंडा रोवल्याचे दिसून येते. आता मात्र पक्षांतर्गत वाढलेल्या गटबाजीच्या राजकारणाची इच्छुकांनी धास्ती घेतली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचा वार सुरु असून काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र घालमेल होत आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदार संघ १९९४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतू काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीमुळे त्या पक्षाला आपल्या बालेकिल्ल्यावर पकड ठेवता आली नाही. या ठिकाणी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून दोन गट पाहावयास मिळत आहे. या गटबाजीचा फटका वारंवार काँग्रेस पक्षाला सहन करावा लागत आहे.

मतदारसंघ क्रमांक – २५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४६,९७७

महिला – १,३२,६७४

एकूण मतदार – २,७९,६५१

विद्यमान आमदार – संजय रायमुलकर, शिवसेना

डॉ. संजय रायमुलकर यांच्यावर मेहकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली आणि रायमुलकर हे येथे आमदार झाले. परंतू शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर हे जरी आमदार असले तरी भाऊ म्हणतील तीच पूर्व दिशा, अशीच काहीशी परिस्थिती मेहकर विधानसभा मतदारसंघाची आहे. त्यामुळे येथील सर्व नाड्या या खासदार प्रतापराव जाधव यांच्याच हातात आहेत.

sanjay raimulkar
आमदार संजय रायमुलकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संजय रायमुलकर, शिवसेना – ८०,३५६

२) लक्ष्मणराव घुमरे, काँग्रेस – ४४,४२१

३) नरहरी गवई, भाजप – १७,०३५

४) अश्विनी आखाडे, राष्ट्रवादी – १२,७५९

हे वाचा – ५ – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -