घरमहा @२८८शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७७

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७७

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी (विधानसभा क्र. २७७) हा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग डोंगरी, दुर्गम वाड्यावस्त्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे सोयीसुविधांची वानवा आढळते. विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळविण्यात यशस्वी ठरले. मात्र, तालुक्यातील औद्योगिकीकरणाला बसलेली खीळ त्यांना दूर करता आलेली नाही. या मतदारसंघात गटातटाचे राजकारण चालते. त्यामुळे हा भाग उद्योग-धंद्यांपासून दूरच राहिला. परिणामी येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आढळते. तालुक्यातील काही भाग सोडले तर हा भाग व्यावसायिक, औद्योगिक शिक्षणापासूनही लांबच राहिला आहे.

मतदारसंघ क्रमांक – २७७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरूष – १,३९,०४०
महिला – १,२८,३१६
एकूण – २,६७,३५६

- Advertisement -

विद्यमान आमदार – सत्यजित बाबासाहेब पाटील-सरुडकर 

satyajeet patil sarudkar
विद्यमान आमदार – सत्यजित बाबासाहेब पाटील-सरुडकर

त्यजित बाबासाहेब पाटील-सरुडकर हे शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २६ नोव्हेंबर १९७४ रोजी कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्याती सरूड येथे सत्यजित पाटील-सरुडकर यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचन आणि खेळाची आवड आहे. मागील निवडणूकीत जनसुराज्य पक्षाच्या विनय कोरेंनी सत्यजित पाटील-सरुडकर यांना टक्कर दिली. या निवडणूकीत सत्यजित पाटील-सरुडकर यांचा निसटता विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना – ७४,७०२
२) विनय कोरे, जनसुराज्य – ७४,३१४
३) अमरसिंह पाटील, स्वा. शेतकरी संघटना – २७,९५३
४) कर्णसिंग गायकवाड, काँग्रेस – २१,४४३
५) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – ४,६७१

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७६

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -