१ – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ

Mumbai
1 - Nandurbar (ST) Lok Sabha Constituency
नंदुरबार

नंदुरबार या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन १९९८ मध्‍ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत. या जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा आणि धडगाव हे सात तालुके येतात. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे. या जिल्ह्यातले सहाही तालुके आदिवासी बहुल आणि चार विधासभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखईची दरी आहे आणि एक धबधबाही आहे. उनपदेव-सुनपदेव (शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रकाशा हे शहादामधील शंकराचे जागृत देवस्थान आहे. हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – १

नाव – नंदुरबार

संबंधित जिल्हे – नंदुरबार आणि धुळे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – कारखाने, सागाच्या लाकडाची बाजारपेठ, सूत गिरण्या, औषधं आणि सुगंधी तेल बनवण्याचे उद्योग

शिक्षणाचा दर्जा – ४६.६३ टक्के


मतदारसंघ राखीव – (ST)

एकूण मतदार – ११ लाख १४ हजार ३८४

महिला – ८ लाख २० हजार ३२८

पुरुष – ८ लाखा ५१ हजार ६६१


लोकसभा निवडणूक – २०१९ चे  निकाल

डॉ. हीना गावित – भाजप – ६ लाख ३९ हजार १३६

अॅड. के.सी. पदवी – काँग्रेस -५ लाख ४३ हजार ५०७

अंतुर्लीकर सुशील सुरेश – वंचित बहुजन आघाडी – २५ हजार ७०२

नोटा – २१ हजार ९२५

डॉ. नटवाडकर सुहास जयंत – अपक्ष – १३ हजार ८२०


नंदुरबार विधानसभा मतदारसंघ

नंदुरबार जिल्हा

१ अक्कलकुवा (ST) – के. सी. पाडवी, काँग्रेस

२ शहादा (ST) – उदेसिंग पाडवी, भाजप

३ नंदुरबार (ST) – विजयकुमार गावित, भाजप

४ नवापूर (ST) – सुरूपसिंग नाइक, काँग्रेस

धुळे जिल्हा

५ साक्री (ST) – डी. एस. अहिरे, काँग्रेस

९ शिरपूर (ST) – काशीराम पावरा, काँग्रेस


dr. heena gavit
डॉ. हीना गावित, भाजप

विद्यमान खासदार – हीना गावित, भाजप

डॉ. हीना गावित या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असून त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नंदुरबार मतदार संघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार माणिकराव गावित ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. २६ वर्षे वय असलेल्या तसेच पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या गावित या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरूण खासदार आहेत. नवापूर पालिकेची जबाबदारी तर खुद्द खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर असताना याठिकाणी एकही जागा भाजपच्या हाती लागली नाही. अंतर्गत कलह हाही भाजपसमोरचा आव्हानाचा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकी आधी भाजपचं जिल्हाध्यक्षपद असलेल्या खासदार डॉ. हीना गावित यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे डॉ. हीना आणि भाजपचे नंदुरबार जिल्यातील भविष्य या निवडणुकीत ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष असताना डॉ हीना यांना त्यांच्याच पक्षातल्या आमदार उदेसिंग पाडविनाच्या विरोधाचा सामना करावा लागतो. त्यात भरीस भर म्हणजे डॉ. हीना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने त्यांच्यासोबत राष्टवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही भाजपमध्ये आले.


२०१४ मधील मतांची आकडेवारी

डॉ. हीना गावित, भाजप – ५ लाख ७८ हजार १६६

माणिकराव गावित, काँग्रेस – ४ लाख ७१ हजार ६४३

अमित वसवे, बसपा – १२ हजार १२८

नोट – २१ हजार १६३

मतदानाची टक्केवारी – ६६.७५ टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here