करोनाशी लढताना १८ डॉक्टर शहीद

डॉक्टर डे निमित्ताने व्यक्त होतोय आदर

Mumbai
attack on doctors indian medical association declares 23 april as black day

करोना संसर्गाच्या काळात डॉक्टर रुग्णांची अहोरात्र सेवा करण्यात गुंतले असताना करोनाशी लढताना तब्बल १८ डॉक्टर शहीद झाले आहे. इतकेच नव्हेतर १२०० पेक्षा जास्त डॉक्टरांना करोनाची बाधी झाल्याचे आढळले आहे. आज १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जात असताना डॉक्टरांकडून होत असलेल्या करोनारुग्ण सेवेबद्दल समाजात आदराची भावना आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीतील योद्धे म्हणून ते लढत असताना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. करोना संकटात डॉक्टर बांधवांकडून होत असलेली मानवसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, त्यांचे स्थान आपल्या हृदयात कायम राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘करोना’च्या संकटाविरुद्ध जगभरातील डॉक्टर जोखीम पत्करुन एकजुटीने लढत आहेत. जगभरातील डॉक्टरांची एकजूट, ज्ञानाच्या, अनुभवाच्या आदानप्रदानाने हा लढा आपण नक्की जिंकू असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. जगभरातील डॉक्टर आज कोरोनाच्या संकटाविरुद्ध ज्या जिद्दीने, ज्या भावनेने लढत आहेत त्याला सलाम आहे. डॉक्टरांच्या सेवाकार्याबद्दल आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. कृतज्ञ आहोत अशा शब्दात आपल्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here