घरमहाराष्ट्रराज्यात यंदा २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार

राज्यात यंदा २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार

Subscribe

दिव्यांगाना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारतीय निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल अॅप उपलब्ध करुन दिले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणूका’ (Accessible Elections) हे घोषवाक्य निश्चित केले आहे. राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमीदृष्टी असलेले ३७ हजार ३२४, मुकबधीर २४ हजार ७७, शारीरीक अपंगत्व असलेले १ लाख ८ हजार २२ तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात ३ डिसेंबर २०१८ रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

विशेष नोंदणी अभियान

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्व सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधीत अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दिव्यांगांसाठी मोबाईल अॅप

मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विविध सुविधा, मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्कींग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था तसेच व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे मोबाईल अॅप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -