घरमहाराष्ट्रराज्यात ४.८८ लाख नोटा!

राज्यात ४.८८ लाख नोटा!

Subscribe

सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी नोटाचा पर्याय निवडणार्‍यांची संख्या वाढली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. यात पालघरमध्ये सर्वाधिक नोटा वापरल्याचे दिसते. त्यामुळे वाढता नोटाचा वापर आता सर्वच पक्षांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

जर मतपत्रिकेवरील कोणताही उमेदवार पसंत नसेल तर पर्याय म्हणून नोटाचा वापर अर्थात नन ऑफ द अबोव्हचा वापर केला जातो. मात्र यंदाच्या निकालावर एक नजर टाकली असता यावेळी राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली.

- Advertisement -

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पालघरमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला असून, २९ हजार ४७९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. त्या खालोखाल गडचिरोली चिमूर मतदारसंघात २४ हजार ५९९ मतदरांनी नोटाचा पर्याय निवडला. तर सगळ्यात कमी नोटाचा वापर बीड आणि धुळे या मतदारसंघामध्ये झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
आदिवासी बहुल भागात वाढलाय नोटा

दरम्यान, एकंदरीत आकडेवारी पाहिली तर पालघर, गडचिरोली, ठाणे आणि नंदुरबारमध्ये आदिवासी समाजदेखील राहतो. याच भागात नोटाचे प्रमाण वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कदाचित अक्षिक्षित मतदारांना नेमकं बटण कोणते दाबायचे हे कळत नसल्यामुळे ते शेवटचे बटन दाबून मोकळे होत असावेत, असा अंदाज काही जाणकारांनी बोलून दाखवला. तर यंदा व्हिव्हिपॅटमुळे मतदान झाले की नाही हे समजायला सात सेकंद लागत होते. आधी ३ सेकंद लागत होते, असेदेखील काही जाणकारांनी सांगितले. तर दुसरीकडे मुंबईसारख्या सुशिक्षित भागातही नोटाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई १५११५, ईशान्य मुंबई – १२, ४६६, उत्तर पश्चिम – १८, २२५, दक्षिण मध्य मुंबई – १३,८३४, उत्तर मुंबई – ११, ९६६, उत्तर मध्य मुंबई -१०,६६९ इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

- Advertisement -

सर्वाधिक ‘नोटा’चे पाच मतदारसंघ
१) पालघर २९,४७९
२) गडचिरोली- चिमुर २४, ५९९
३) नंदुरबार २१, ९२५
४) ठाणे २०, ४२६
५) उत्तर-पश्चिम मुंबई १८,२२५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -