राज्यात ४,९०७ नवे रुग्ण, १२५ जणांचा मृत्यू

राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५ हजार ५६० वर पोहोचली आहे.

5548 new corona patient found and 74 death in 24 hours in maharashtra

राज्यात ४,९०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,३१,८३३ झाली आहे. राज्यात ८८,०७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५ हजार ५६० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २२, ठाणे १०, नवी मुंबई मनपा ३, मीरा भाईंदर मनपा ३, नाशिक ५, अहमदनगर ६, पुणे १४, सोलापूर ८, सातारा ९, औरंगाबाद मनपा ७, नांदेड ७, नागपूर ७ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १२५ मृत्यूंपैकी ८४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज ९,१६४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत १५,९७,२५५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६,००,३२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,३१,८३३ (१८.०४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४१,११८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.