आता पाचवीचा वर्ग प्राथमिक गटात मोडणार

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमनातील तरतुदीनुसार आता आता पाचवीचा वर्ग प्राथमिक गटात मोडणार आहे.

5th standard is also included in primary education
आता पाचवीचा वर्ग प्राथमिक गटात मोडणार

आतापर्यंतच्या शिक्षणानुसार पहिली ते चौथी या वर्गांचा प्राथमिक गटात समावेश केला जायचा. तर पाचवी ते दहावी हे वर्ग उच्च प्राथमिक गटात मोडले जायचे. मात्र, आता केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. त्यामुळे आता पाचवीचा वर्ग प्राथमिक गटात मोडणार आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमनातील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निकषानुसार आता माध्यमिक शाळांना जोडलेले पाचवीचे वर्ग आता प्राथमिक शाळांना जोडले जाणार असून या शाळांतील समायोजनही होणार आहे याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळातील शिक्षक संवर्गातील पदे निश्चिचत केली जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक शाळांमधील पाचवीचे वर्ग जवळच्या एक किलोमीटर अंतरावरील चौथीपर्यंत असलेल्या शाळांना जोडले जाणार आहे.

प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीचे वर्ग प्राथमिक आणि उच्च प्राथमिकसाठी सहावी ते आठवी अशा गटातील पदांसाठी केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. या निकषानुसार हा बदल केला जाणार आहे. नव्या धोरणानुसार संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत असेल तर समायोजनासाठी तत्वतः मंजूरी देण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदींचा विचार करून, ज्या माध्यमिक शाळा पाचवी वर्गापासून आहेत. त्या शाळांतील पाचवी वर्ग नजीकच्या एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेत जोडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाचा आहे. यानुसार हा बदल केला जाणार आहे.

अशा आहेत शासन निर्णयातील तरतूदी..

१.ज्या माध्यमिक शाळांमध्ये पाचवीचे वर्ग आहेत. त्या शाळांतील या वर्गातील विद्यार्थ्यांचे समायोजन त्यांच्या इच्छेप्रमाणे व त्यांच्या घराजवळाच्या खासगी अनुदानित, स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळांमध्ये करण्यात येणार
२. पाचवीच्या वर्गाची शाळा एकाच संस्थेची असल्यास शक्यतो सर्व विद्यार्थ्यांसह जोडावी लागणार
३. पहिल्या टप्यात प्राथमिक शाळांत हा वर्ग जोडताना भौतिक सुविधा, वर्गखोली याची व्यवस्था आहे का हे पहावे लागणार
४. या वर्गाच्या शिक्षकांचे समायोजन हे प्रथम प्राधान्याने संस्थेअंर्गत सुरु असलेल्या इतर अनुदानित शाळेत करण्यात यावे, तसेच प्राधान्यक्रम ठरवावा.


हेही वाचा – प्रशासन संवेदनशील हवं, हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.”; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र