घरमहाराष्ट्रनागपूर रेल्वे स्टेशनवर सापडली ९८ जीवंत काडतुसं

नागपूर रेल्वे स्टेशनवर सापडली ९८ जीवंत काडतुसं

Subscribe

नागपूर रेल्वे स्टेशनच्या पलाट क्रमांक ७ वर तीन बॉक्समध्ये ९ एम.एमचे ९८ राऊंड आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यातच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर जिवंत काडतुसं सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील पलाट क्रमांक ७ वर ९८ जिवंत काडतुसं सापडली. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तीन बॉक्समध्ये सापडली काडतुसं

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर जीवंत काडतुसे सापडल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. पलाट क्रमांक ७ वर तीन बॉक्समध्ये ९ एम.एमचे ९८ राऊंड आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसं पाहता नागपूर रेल्वे स्थानक हे संवेदनशील यादीमध्ये आधीपासून आहेच.

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर सतर्कतेचा इशारा

पलाट क्रमांक ७ वर सफाई कामगार लीलाधर राऊत नेहमीप्रमाणे साफसफाई करत होते. त्याना एका ठिकाणी तीन बॉक्समध्ये काही जीवंत काडतुसे दिसली. त्यांनी ताबडतोब या बाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर आरपीएफ आणि नागपूर लोहमार्ग पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी घटास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पंचनामा करून संपूर्ण बुलेट हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणाची लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे. याआधी नाशिकचे देवळाली रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -