घरमहाराष्ट्रमंदिरातील चोरी प्रकरण अहवालासंबंधी चौकशी व्हावी - निलम गोऱ्हे

मंदिरातील चोरी प्रकरण अहवालासंबंधी चौकशी व्हावी – निलम गोऱ्हे

Subscribe

या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन केले जाईल.

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत अनेक नेत्यांनी त्यांचे मत मांडले. या सभेत वर्जेश्वरी आणि तुळजाभवानी मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात शांततेच वातावरण निर्माण झाले. यामध्ये २००८ ते २०१८ या दरम्यान झालेला चोरींचा अहवाल सादर करण्यात आला. परंतू हा अहवाल पूर्ण नसून याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली.

मुंबईसह इतर ठिकाणी मंदिरांमधील चोरीचे प्रकार हळूहळू वाढू लागले आहेत. सरकारने या विषयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा मंदिरात जाणाऱ्या लोकांचा सरकारवर विश्वास राहणार नाही, असे स्पष्ट होते. भिवंडी येथील वज्रेश्वरी आणि तुळजाभवानी मंदिरात मोठी चोरी झाली होती. त्यामध्ये देवीचे दागिने, पुरातन शिवकालीन नाणी आणि इतर दस्ताऐवज चोरीला गेले होते. परंतू या चोरीचा अहवाल अपूर्ण असल्याचे शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी सभागृहात सांगितले. २००० ते सन २०१८ पर्यंत झालेल्या घटनांचा या अहवालामध्ये समावेश आहे. यावर गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन केले जाईल, असे सांगितले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, २००१ ते २००५ या दरम्यान मंदिरातील चोरीच्या घटनांची संख्या जास्त होती. या दरम्यान दानपेटी रक्कम अपहार, देवीच्या दागिन्यांचा अपहार याबाबत जिल्हाधिकारी यांनी तपास करून अहवाल सादर केला होता. परंतू हा अहवाल पूर्ण नसून, याची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -