घरमहाराष्ट्रपरळहून दापोलीला जाणारी एसटी बस नदीत कोसळली

परळहून दापोलीला जाणारी एसटी बस नदीत कोसळली

Subscribe

३३ जखमी, ३ अत्यवस्थ,माणगावजवळ अपघात

परळ (मुंबई) येथून दापोलीकडे निघालेली एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावर येथून २ किलोमीटर अंतरावर कळमजे फाट्याजवळ गोद नदीच्या पुलावरून कोसळून चालक-वाहकासह ३३ जण जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये बसच्या चालक आणि वाहक यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे ५.30 वाजता ही दुर्घटना घडली. दापोली आगाराच्या या बस (एमएच 14 बीटी 0143) मधून 44 जण प्रवास करीत होते. वेगात असलेल्या या बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने कठडे नसलेल्या या पुलावरून ती थेट खाली कोसळली. सुदैवाने नदीच्या किनारी भागात बस कोसळली, अन्यथा पुढे पाण्यात कोसळली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. अपघात घडताच आजूबाजूच्या रहिवाशांनी, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघात घडला तेव्हा बहुतेक प्रवासी साखर झोपेत होते. बस कोसळताच एकच हलकल्लोळ उडाला.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे- १) दत्ताराम दगडू मोरे (६३,रा. दापोली), २) वंदना गणेश जालगावकर (४५, नालासोपारा), 3) विनया महाडिक (५०, वडवली-दापोली), 4) गणेश जालगावकर (५०, नालासोपारा), सुनील सापळे (६०, दापोली), 5) लता जाधव (४९, गणपतीपुळे), 6) अरुण महाडिक (६१, माटवण), 7) अनिता अरुण महाडिक (५५, रा. माटवण), 8) सुभाष लिमये (६४, मुलुंड), 9) दाऊद मुरुडकर (७८, टागर), 10) नामदेव इंदुलकर (८२, हालिफ), 11) संतोष मोरे (४५, माटवण), 12) सुमंगल महाडिक (३२, वडवली), 13) विनय जोधले (५२, टागर), 14) कमलाकर मिझुलकर (बस वाहक, ५३, दापोली), 15) रवींद्र इंदुलकर (५२, हालिफ), 16) सावित्रीबाई पाटणे (७८, टागर), 17) सुरेश पाटणे (५१, गणपतीपुळे), 18) दीप्ती जाधव (४०, शिरसोली), 19) राकेश जाधव (४०, शिरसोली), 20) संतोष साळवी (४०, पाचोली), 21)अशोक इंदुलकर (७०, हालिफ), 22) प्रकाश कदम (५९, टागर), 23) विजय लुके (६७, माटवण), 24) सानिका परब (३४, शिरसोली), 25) शेखर माने (५५, मुंबई), 26) सुधाकर कदम (४५, मंडणगड), 27) प्रतिभा कदम (५५, दापोली), 28) स्वाती माने (४६, मुंबई), 29) श्रवण परब (२, शिरसोली), 30) किरण कदम (३६, टागर), 31) देवेंद्र येलवे (बस चालक, ३३, वायंगणी), 32) अविनाश जाधव (२७, शिरसोली) आणि 33) सागर खसपले (४२, येरव).

- Advertisement -

जखमींपैकी सुमंगल महाडिक, सावित्रीबाई पाटणे आणि अनिता महाडिक यांची प्रकृती खालावल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने मुंबईत हलविण्यात आले आहे. अपघातात अडीच वर्षाच्या एका बालकाला साधे खरचटलेही नाही. अपघातातील जखमींची उप जिल्हा रुग्णालयात जाऊन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विचारपूस करून धीर दिला. अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून, निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कावळे अधिक चौकशी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -