घरमहाराष्ट्रमुक्त विद्यालय मंडळाची प्रवेशप्रक्रिया १ डिसेंबरपासून

मुक्त विद्यालय मंडळाची प्रवेशप्रक्रिया १ डिसेंबरपासून

Subscribe

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच कला व क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता ५ वी ते ८ वी इयत्तेमध्ये प्रवेशासाठी १ डिसेंबरपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे विविध कारणामुळे ज्यांनी आपले शिक्षण अपूर्ण सोडले आहे. तसेच कला व क्रीडा क्षेत्रात करियर करू इच्छिणार्‍यांना विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक संधी उपलब्ध झाली आहे.

समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थी शिकला पाहीजे, याकरता अनेक योजना सरकार राबवतं. तरीही अनेक विद्यार्थी काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच कला व क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवेशप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र आता या मंडळाची प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबरपासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळांतर्गत विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मंडळाच्या http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • नोंदणी : १ ते ३१ डिसेंबर
  • कागदपत्रे जमा करण्याची मुदत : २ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१
  • शाळांमध्ये कागदपत्रे पाठविण्याची मुदत : ८ जानेवारी २०२१ पर्यंत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -