घरताज्या घडामोडीसुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

Subscribe

महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. प्रणव राऊत (२२) असे या बॉक्सरचे नाव असून अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नेमके काय घडले?

राष्ट्रीय बॉक्सर प्रणव राऊत आज सकाळी साडे नऊच्या सुमारास आपल्या रुममधून बाहेर का आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. तसेच अनेक वेळा आवाज देऊन देखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे आढळले. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.

- Advertisement -

‘जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच
प्रणव कालपर्यंत ठिक होता. त्याच्या वागण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात असल्याचे जाणवले नाही’,अशी माहिती प्रणवच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी दिली.प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा – भाजपची बी टीम अॅक्टिव्ह, सतर्क रहा; जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -