भाजपची बी टीम अॅक्टिव्ह, सतर्क रहा; जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन

वारिस पठाण यांनी गुरुवारी चिथावणीखोर विधान कलबुर्गी येथील सभेत केलं होतं. यावर जयंत पाटील यांनी भाजप व एमआयएमवर निशाणा साधत भेदवादी वृत्तींपासूनही सतर्क रहावे, असं म्हटलं आहे.

jayant patil slams chandrkant patil over to hold a convention Maratha reservationjayant patil slams chandrkant patil over to hold a convention Maratha reservation
पंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का?, जयंत पाटील यांचं भाजपवर टीकास्त्र

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचे राजकिय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. आपल्या एकतेच्या बळावर देशातील जनता नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसीविरोधातील लढा लढत आहे. हे बघुन भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आता भाजपने आपल्या बी टीमला अॅक्टिव्ह केले आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप व एमआयएमवर निशाणा साधला आहे. भेदवादी वृत्तींपासूनही सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट,” असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी २० फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. पठाण यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची देखील उपस्थिती होती. याच प्रकरणावरून मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

पठाण यांच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरावर पठाण यांचा निषेध व्यक्त केला आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि असंख्य विवेकवादी लोकांनी पठाण यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.